शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सातारची पोरं खातायंत पौष्टिक डबा

By admin | Updated: July 5, 2017 13:08 IST

शाळांमधील चित्र : कॅन्टीन नसल्यामुळे विद्यार्थ्यांना डब्यात पोळी भाजी आणण्याची सक्ती

सातारा : बदललेल्या खाद्य संस्कृतीचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर दिसू लागल्याने गत महिन्यात महाराष्ट्र शासनाने शाळांच्या कॅन्टीनमध्ये जंक फुड बंदी घातली होती. या पार्श्वभूमीवर शहरातील शाळांची पाहणी केली असता बहुतांश शाळांमध्ये कॅन्टीन नाही आणि जिथे कॅन्टीन आहे, तिथे विद्यार्थ्यांना सकस आणि पौष्टिक अन्न मिळत असल्याचे चित्र दिसले. काही शाळांनी तर विद्यार्थ्यांच्या वह्यांमध्ये पोळी भाजी सक्तीने आणण्याची सूचनाही लिहून दिल्या आहेत.

गेल्या काही वर्षांत बदललेल्या जीवनशैलीबरोबरच खाद्यसंस्कृतीही बदल चालली आहे. घरात शिजवलेले, सकस आणि पौष्टिक अन्नाची जागा जंक फुडने घेतली आहे. घरातल्या मोठ्या माणसांच्या बरोबरीने लहान मुलेही मिटक्या मारत हे पदार्थ खाताना दिसतात. यामुळे लहान वयात वजन वाढणे आणि वाढत्या वजनाबरोबरीने येणारे आजार मुलांना जडत आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आल्याचे लक्षात आले. त्यानंतर राज्य शासनाने जंक फूड, अधिक शर्करा असणारे, मीठ अतिप्रमाणात असलेले, मेदयुक्त पदार्थांवर बंदी घातली होती. त्याऐवजी डब्यात पोळी भाजीसारखा आहार द्यावा, असा निर्णय घेण्यात आला होता.

सातारा शहरात माध्यमिक सैनिक स्कूल ही निवासी शाळा आहे. तर सिनर्जी आणि युनिव्हर्सल या दोन शाळांमध्ये कॅन्टीन आहे. या दोन्ही शाळांच्या कॅन्टीनमध्ये विद्यार्थ्यांच्या आहाराचा चार्ट लावण्यात आला आहे. त्यामुळे येथे विद्यार्थ्यांना रोजच्या रोज सकस अन्न मिळत असल्याचे चित्र दिसले.

शाळेच्या बाहेर दुकानांची गर्दी

 

शहरात बहुतांश शाळांच्या बाहेर जंक फुड विक्री जोरदार सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले. विद्यार्थी वाहतूक वाहनातून उतरणाऱ्या मुलांचा जथ्थाच्या जथ्था या दुकानांमध्ये गर्दी करतो. शाळा भरण्यापूर्वी आणि सुटल्यानंतर या दुकानांमध्ये तुडुंब गर्दी असते. ज्या विद्यार्थ्यांनी डबा आणला नाही, ते विद्यार्थी शाळेची परवानगी घेऊन बाहेरून वेफर्स, वडापाव यासारखे पदार्थ आणून खात असल्याचे पाहायला मिळाले.

वडापाव पार्टी ठरलेली

शहराच्या मध्यवर्ती असलेल्या काही शाळा परिसरात वडापावचा धंदा जोरात चालत असल्याचे चित्र दिसते. माध्यमिक शाळांतील विद्यार्थी वडापाव खाण्याकडे अधिक वळतात. कित्येकदा मित्राचा वाढदिवस साजरा करण्याचं ठिकाण म्हणून ही वडापावच्या गाडीचा आसरा घेतला जातो. शाळा भरण्यापूर्वी, मधल्या सुटीत आणि शाळा सुटल्यानंतर असं तीन वेळेला वडापावची भट्टी पेटते. काहींनी तर वडापाव उधारीवर घेऊन त्याची स्वतंत्र वहीही घातली असल्याचे स्पष्ट झाले.

विद्यार्थ्यांवर सक्ती... शिक्षकांचेही लक्ष

शहरातील अनेक शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने डब्यात पोळी भाजी आणण्याच्या सूचना केल्या होत्या. प्राथमिक स्तरावर शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या वह्यांमध्ये ही सूचना लिहून दिली होती. विद्यार्थी डब्यात काय आणतात, हे पाहण्याची जबाबदारी त्या वगार्तील विद्यार्थ्यांकडे दिली जाते. जर कोणी पोळी भाजी व्यतिरिक्त काहीही अन्य खाद्य पदार्थ आणला असेल तर तो जप्त करतात. तर वगार्तील सर्व त्याला आपल्या डब्यातील खाऊ देतात. त्यानंतर त्याच्या पालकाला डायरीमध्ये याविषयी तक्रार लिहून दिली जाते.

अतिरिक्त क्लास अन् जंक फुड!

माध्यमिक वर्गात गेलेल्या विद्यार्थ्यांना पालकांनी भरमसाठ खासगी क्लासेस लावले आहेत. त्यामुळे सकाळी सहा वाजता गेलेली लेकरं संध्याकाळी सात वाजताच घरी येतात. घरातून सकाळी लवकर तयार करून घेतलेला डबा दुपारपर्यंत गार होतो. एकच भाजी दोन-दोनदा खाणे अहस्य होते. त्यामुळे शाळे बाहेर मिळणारा वडापाव, सामोसा हे पर्याय आम्हाला बरे वाटतात, असे एक विद्यार्थी लोकमतशी बोलताना म्हणाला.

पालकांची धावपळ अन् डब्याचा शॉर्टकट

नोकरी आणि व्यवसायाच्या मागे लागलेल्या पालकांना विद्यार्थ्यांना पौष्टिक अन्न मिळावे हे कितीही वाटत असले तरीही शाळेच्या वेळेत ते तयार होणं अवघड झाले आहे. त्यामुळे काहीदा विद्यार्थ्यांच्या डब्यात शिळे अन्नही शिक्षकांना आढळले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात तर हे अन्न नासते आणि विद्याथ्यार्ला उपाशी राहावे लागते. पालकांच्या व्यस्त दिनचयेर्मुळे ते मुलांच्या डब्याला शॉर्टकट शोधतात आणि मग घरातील शिळी चपाती किंवा शिल्लक राहिलेली आदल्या दिवशीची भाजी त्यांच्या डब्यात जाते.