शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

सातारची पोरं खातायंत पौष्टिक डबा

By admin | Updated: July 5, 2017 23:30 IST

सातारची पोरं खातायंत पौष्टिक डबा

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : बदललेल्या खाद्य संस्कृतीचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर दिसू लागल्याने गत महिन्यात महाराष्ट्र शासनाने शाळांच्या कॅन्टीनमध्ये जंक फुड बंदी घातली होती. या पार्श्वभूमीवर शहरातील शाळांची पाहणी केली असता बहुतांश शाळांमध्ये कॅन्टीन नाही आणि जिथे कॅन्टीन आहे, तिथे विद्यार्थ्यांना सकस आणि पौष्टिक अन्न मिळत असल्याचे चित्र दिसले. काही शाळांनी तर विद्यार्थ्यांच्या वह्यांमध्ये पोळी भाजी सक्तीने आणण्याची सूचनाही लिहून दिल्या आहेत.गेल्या काही वर्षांत बदललेल्या जीवनशैलीबरोबरच खाद्यसंस्कृतीही बदल चालली आहे. घरात शिजवलेले, सकस आणि पौष्टिक अन्नाची जागा जंक फुडने घेतली आहे. घरातल्या मोठ्या माणसांच्या बरोबरीने लहान मुलेही मिटक्या मारत हे पदार्थ खाताना दिसतात. यामुळे लहान वयात वजन वाढणे आणि वाढत्या वजनाबरोबरीने येणारे आजार मुलांना जडत आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आल्याचे लक्षात आले. त्यानंतर राज्य शासनाने जंक फूड, अधिक शर्करा असणारे, मीठ अतिप्रमाणात असलेले, मेदयुक्त पदार्थांवर बंदी घातली होती. त्याऐवजी डब्यात पोळी भाजीसारखा आहार द्यावा, असा निर्णय घेण्यात आला होता. सातारा शहरात माध्यमिक सैनिक स्कूल ही निवासी शाळा आहे. तर सिनर्जी आणि युनिव्हर्सल या दोन शाळांमध्ये कॅन्टीन आहे. या दोन्ही शाळांच्या कॅन्टीनमध्ये विद्यार्थ्यांच्या आहाराचा चार्ट लावण्यात आला आहे. त्यामुळे येथे विद्यार्थ्यांना रोजच्या रोज सकस अन्न मिळत असल्याचे चित्र दिसले. शाळेच्या बाहेर दुकानांची गर्दीशहरात बहुतांश शाळांच्या बाहेर जंक फुड विक्री जोरदार सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले. विद्यार्थी वाहतूक वाहनातून उतरणाऱ्या मुलांचा जथ्थाच्या जथ्था या दुकानांमध्ये गर्दी करतो. शाळा भरण्यापूर्वी आणि सुटल्यानंतर या दुकानांमध्ये तुडुंब गर्दी असते. ज्या विद्यार्थ्यांनी डबा आणला नाही, ते विद्यार्थी शाळेची परवानगी घेऊन बाहेरून वेफर्स, वडापाव यासारखे पदार्थ आणून खात असल्याचे पाहायला मिळाले. शाळेच्या बाहेर दुकानांची गर्दीशहराच्या मध्यवर्ती असलेल्या काही शाळा परिसरात वडापावचा धंदा जोरात चालत असल्याचे चित्र दिसते. माध्यमिक शाळांतील विद्यार्थी वडापाव खाण्याकडे अधिक वळतात. कित्येकदा मित्राचा वाढदिवस साजरा करण्याचं ठिकाण म्हणून ही वडापावच्या गाडीचा आसरा घेतला जातो. शाळा भरण्यापूर्वी, मधल्या सुटीत आणि शाळा सुटल्यानंतर असं तीन वेळेला वडापावची भट्टी पेटते. काहींनी तर वडापाव उधारीवर घेऊन त्याची स्वतंत्र वहीही घातली असल्याचे स्पष्ट झाले.पालकांची धावपळ अन् डब्याचा शॉर्टकटनोकरी आणि व्यवसायाच्या मागे लागलेल्या पालकांना विद्यार्थ्यांना पौष्टिक अन्न मिळावे हे कितीही वाटत असले तरीही शाळेच्या वेळेत ते तयार होणं अवघड झाले आहे. त्यामुळे काहीदा विद्यार्थ्यांच्या डब्यात शिळे अन्नही शिक्षकांना आढळले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात तर हे अन्न नासते आणि विद्यार्थ्याला उपाशी राहावे लागते. पालकांच्या व्यस्त दिनचर्येमुळे ते मुलांच्या डब्याला शॉर्टकट शोधतात आणि मग घरातील शिळी चपाती किंवा शिल्लक राहिलेली आदल्या दिवशीची भाजी त्यांच्या डब्यात जाते.