सातारकरांचे ‘गुडमॉर्निंग’ अडीच कोटींच

By Admin | Updated: December 12, 2014 23:45 IST2014-12-12T22:23:51+5:302014-12-12T23:45:06+5:30

सोशल मीडियाचा वापर : सूचनाफलकांवरून ‘व्हॉट्सअ‍ॅप’मार्गे सुविचारांचा प्रवास पुन्हा फलकाकडे

Satkarkar's 'Gooding' two and a half million | सातारकरांचे ‘गुडमॉर्निंग’ अडीच कोटींच

सातारकरांचे ‘गुडमॉर्निंग’ अडीच कोटींच

प्रगती जाधव-पाटील-सातारा -‘दुनिया गोल आहे’ हे जीवनात पुन:पुन्हा भेटणाऱ्या माणसांपासून फॅशनच्या दुनियेपर्यंत अनेक ठिकाणी प्रत्ययास येते. परंतु हे वास्तव माणसांबरोबरच सुविचारांनाही लागू पडले आहे. पूर्वी चौकातील सूचनाफलकावर दिसणारे सुविचार एसएमएसमार्गे व्हॉट््सअपवर गेले. आता ते पुन्हा मोबाईलमार्गे फलकावर अवतरले आहेत. दरम्यान, केवळ ‘गुडमॉर्निंग’ मेसेजवर सातारकर महिन्याकाठी अडीच कोटी रुपये खर्च करीत असल्याचे आढळून आले आहे.
सोशल मीडिया कोणत्या कारणासाठी किती वापरला जातो, याचा आढावा घेतला असता सर्वाधिक वापर गुडमॉर्निंग, गुडनाइट मेसेजसाठी होत असल्याचे समोर आले आहे. साताऱ्यात पूर्वीपासून सूचनाफलकावर सुविचार लिहिण्याची परंपरा आहे. पेठेतील एखाद्या गटाने याची जबाबदारी घेऊन रोज सकाळी सातच्या आधी एक सुविचार फलकावर लिहिणे बंधनकारक होते. दैनंदिन वाचनातील पुस्तके, तर कधी वृत्तपत्रांमधून येणारे सुविचार या सूचनाफलकांवर दिसत होते. दिवसाची चैतन्यदायी सुरूवात करण्यासाठी आणि दिवसभर सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी फलकावरील सुविचार वाचणाऱ्यांची संख्या पूर्वी खूप होती.
पेठेत मोक्याच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या या सुविचारांनी अनेकांचे दिवस चांगले घालविले होते. शहरात अजूनही नित्यनेमाने फलकांवर सूचना आणि सुविचार लिहिणाऱ्यांची संख्या बरीच आहे.
आधुनिक युगात यात बदल झाला तो संदर्भाचा! पूर्वी लोक पुस्तक हातात घेऊन सूचना फलकावर सुविचार लिहायचे. आता भ्रमणध्वनी त्यांचा सांगाती झाला आहे. सध्या भ्रमणध्वनी आणि सोशल नेटवर्क हे दोन्ही अविभाज्य घटक आहेत. त्यामुळे व्हॉटस् अ‍ॅप, हाईक या माध्यमातून रोज सकाळी काही सुविचार येऊन धडकतात. यात काही गंमतीशीर सुविचारही असतात. सामान्यांपर्यंत हे आधुनिक सुविचार पोहोचावे म्हणून सूचना फलकांवर सोशल मीडियाची झलक दिसू लागली आहे.
जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात घडलेली कोणतीही गोष्ट काही सेकंदात मोबाईलवर पाहायला मिळते. दिवसाची सुरूवात गंभीर सुविचार ऐकून करण्यापेक्षा काहीदा खुसखुशीतन विनोदातूनही दिवसाची चांगली सुरूवात करण्यात आता सोशल मीडिया अग्रभागी असल्याचे दिसत आहे.


सूचना फलकावर क्रिकेट स्कोअर!--लोकमत
सर्वेक्षण
सातारा शहरातील मंगळवार पेठ परिसरात पूर्वी एक पानपट्टी होती. या पानपट्टीचे मालक ‘डॅनी’ या नावाने परिसरात परिचित होते. त्यांना क्रिकेटची भयंकर आवड. ट्रान्झिस्टर रेडिओवर जीव कानात आणून ते मॅच ऐकत! त्यानंतर प्रत्येक ओव्हरनंतर दुकानाच्या बाहेर येऊन ते स्कोअर लिहीत.
पूर्वी टीव्ही आणि ट्रान्झिस्टर यांची संख्या कमी असल्याने भागातील प्रत्येकाचे लक्ष त्यांच्या सूचना फलकाकडे असायचे.
राजवाड्याकडे जाणारा आणि येणारा प्रत्येकजण त्या फलकावरील स्कोअर बघितल्याशिवाय पुढे जात नसे. कालांतराने अनेकांच्या घरात टीव्ही आला, तरीही त्यांनी स्कोअर लिहिण्याचा शिरस्ता सोडला नाही.


अबब महिन्याकाठी अडीच कोटी!
सुमारे तीन लाख सातारकर मोबाईलवर सोशल नेटवर्किंगचा वापर करतात.
नेक कंपन्या साधारण शंभर रूपयांपासून नेटपॅक देतात.
विविध छायाचित्र, व्हिडिओ यांचे डाऊनलोडिंगचा खर्च शंभर रूपयातील पन्नास रूपये इतका होतो.
रोज सुप्रभात आणि शुभ रजनीचे मेसेज देण्यासाठी सातारकर उरलेले पन्नास रूपये खर्च करतात. यातून सरासरी एका महिन्याला अडीच कोटी रूपयांचा चुराडा होतो.

Web Title: Satkarkar's 'Gooding' two and a half million

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.