शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Kaas plateau: जागतिक वारसास्थळ कास पठारावर फुलला 'सातारीतुरा', पर्यटकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 18:20 IST

पहिला पाऊस झाल्यानंतर सह्याद्रीच्या काही भागात, खडकात, मातीचा भाग व त्यामध्ये पाणी साचते, अशा ठिकाणी ही वनस्पती आढळते.

पेट्री : जागतिक वारसा हक्काच्या यादीत समावेश असलेल्या कासच्या शिरपेचात सातारीतुरा उमलला आहे. ‘सातारान्सिस’ हे फूल जून महिन्याच्या पहिल्या पावसात दर्शन देऊ लागले आहे.‘सातारीतुरा’ या फुलाला शास्त्रीय भाषेत ‘अपोनोजेटॉन सातारान्सिस’ म्हणूनही ओळखले जाते. दुर्मीळ वनस्पतीपैकी मुळाशी कंद असणारे हे भुई आर्किड आहे. पहिला पाऊस झाल्यानंतर सह्याद्रीच्या काही भागात, खडकात, मातीचा भाग व त्यामध्ये पाणी साचते, अशा ठिकाणी ही वनस्पती आढळते. जमिनीत छोटा कंद असतो. त्यावर येणारे पान हे लांब व जाडसर आकाराचे असते. भाल्यासारखे दिसते.पानामध्ये अन्नसाठा भरपूर प्रमाणात साठवत असते. दोन ते तीन पानांच्या बेचक्यातून लांब व जाडसर अशा दांड्यात इंग्रजी ‘वाय’ आकाराचा तुरा येतो. म्हणून यास ‘वायतुरा’ म्हणतात. हे फूल केवळ साताऱ्याच्या पश्चिम भागात चार ते पाच ठिकाणीच सड्यावर आढळते. म्हणून यास ‘सातारीतुरा’ म्हणतात. सातारीतुरा वनस्पती कास पठार व परिसरातील जैवविविधतेचे भूषण ओळखले जाते. शनिवार, रविवार, तसेच जोडून सुट्टी असल्यास कास पठार, कास तलाव परिसरात पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. दरम्यान, पर्यटकांच्यात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.

कास पठाराचे वैशिष्ट्य!जून ते ऑक्टोबर महिन्यांदरम्यान तृण, कंद, वेली, तसेच वृक्ष, झुडपे, आर्किड व डबक्यातील वनस्पतींना अत्यंत आकर्षक निळ्या, जांभळ्या, लाल रंगाची फुले येतात. मध्य ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात विविधरंगी दुर्मीळ फुलाचे गालिचे आकर्षित करतात. या पठारावरील सुंदर अशा विविधरंगी फुलांचा कालावधी आठ ते पंधरा दिवसांचा असतो.

सातारीतुरा म्हणजेच वायतुरा आहे. सह्याद्रीच्या पठारावर येणारी ही पहिली प्रजाती असून, ती अतिशय सुंदर व विलोभनीय आहे. अशा प्रकारच्या अनेक दुर्मीळ प्रजातीचे रक्षण करून पर्यावरणाचे संरक्षण होणे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे. - प्रदीप शिंदे, कर्मचारी, कास पठार.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKas Patharकास पठार