शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याच्या सुपुत्राला लडाखमध्ये वीरमरण, गावावर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 09:18 IST

वाई तालुक्यातील आसले गावचे सुपुत्र सोमनाथ मांढरे यांची शुक्रवार पहाटेपासून येथील प्रदेशात नेमणूक होती. कर्तव्यावर असतानाच ते बेशुद्ध झाले. त्यामुळे, त्यांना जवळच्या लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

ठळक मुद्देवाई तालुक्यातील आसले गावचे सुपुत्र सोमनाथ मांढरे यांची शुक्रवार पहाटेपासून येथील प्रदेशात नेमणूक होती. कर्तव्यावर असतानाच ते बेशुद्ध झाले. त्यामुळे, त्यांना जवळच्या लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

सातारा - जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील आसले गावच्या भुमीपुत्राला लडामध्ये वीरमरण आले. सोमनाथ मांढरे असं या वीर जवानाचं नाव असून लडाखमधील बर्फाच्छादित प्रदेशात प्रतिकुल वातावरणाशी लढताना त्यांना श्वासोच्छवास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे, ते बेशुद्ध पडले होते, त्यानंतर त्यांना तात्काळ मिल्ट्रीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.     वाई तालुक्यातील आसले गावचे सुपुत्र सोमनाथ मांढरे यांची शुक्रवार पहाटेपासून येथील प्रदेशात नेमणूक होती. कर्तव्यावर असतानाच ते बेशुद्ध झाले. त्यामुळे, त्यांना जवळच्या लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबत, सैन्य दलाकडून वाईचे तहसीलदार रणजीत भोसले यांना ही माहिती मिळाली. त्यांनी आसले (ता. वाई) येथील त्यांचे बंधू महेश मांढरे यांना ही दु:खद घटना कळवली. हुतात्मा जवान सोमनाथ मांढरे यांचे पार्थिव आज पहाटे दिल्लीत पोहोचेल. त्यानंतर, सायंकाळपर्यंत आसले या मूळ गावी पोहोचेल व त्यांच्यावर शासकीय इतमामात आसलेत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दरम्यान, सोमनाथ मांढरे यांच्या निधनामुळे आसले गावावर शोककळा पसरली असून कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मांढरे यांच्या पश्चात पत्नी, आठ वर्षांचा मुलगा, अवघ्या दहा महिन्यांची मुलगी व लहान भाऊ असा परिवार आहे.  

टॅग्स :satara-acसाताराIndian Armyभारतीय जवानladakhलडाखSoldierसैनिक