शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याचा शाही दसरा यंदा साधेपणाने होणार, उदयनराजेंनी पूरग्रस्तांसाठी मदतीचे केले आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 16:48 IST

​सातारा : महाराष्ट्रातील अनेक गावे आज भीषण पूरतांडवाच्या विळख्यात असताना, खासदार उदयनराजे भोसले यांनी राजघराण्याच्या संवेदनशीलतेचा वारसा  प्रखरतेने जपला ...

​सातारा : महाराष्ट्रातील अनेक गावे आज भीषण पूरतांडवाच्या विळख्यात असताना, खासदार उदयनराजे भोसले यांनी राजघराण्याच्या संवेदनशीलतेचा वारसा  प्रखरतेने जपला आहे. दि. २ ऑक्टोबर रोजी साताऱ्यात होणारा ऐतिहासिक शाही दसरा आणि सीमोल्लंघन सोहळा, डामडौल, राजेशाही थाट बाजूला ठेवून अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून पूरग्रस्तांसाठी मदतीचे भावनिक आवाहनही केले आहे. याबाबत प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात उदयनराजे यांनी नमूद केले आहे की, मराठवाडा, कोकण आणि साताऱ्याच्या पूर्वभागात वरुणराजाने कहर केला आहे. या पावसात जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली असून, बळीराजा पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. पशुधनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकंदरीत जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत साताऱ्याचा शाही विजयादशमी आणि सिमोल्लंघन सोहळा थाटामाटात, धूमधडाक्यात, डामडौलात करणे हे आमच्या मनाला पटणारे नाही.पावसामुळे मराठवाड्यासह नुकसान झालेल्या गावांना मोठ्या मदतीची गरज आहे. त्यामुळे शाही दसरा अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक नागरिकाने एक भारतीय म्हणून पूरबाधितांच्या मदत कार्यासाठी शक्य होईल तितकी आर्थिक किंवा वस्तु किंवा धान्य स्वरुपातील मदत, जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातील मुख्यमंत्री पूरग्रस्त सहाय्यता निधीमध्ये जमा करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara's Royal Dussehra to be simple; Udayanraje appeals for flood relief.

Web Summary : Udayanraje Bhosale will observe a simple Dussehra due to floods. He appealed to citizens to contribute to the Chief Minister's Relief Fund for flood victims in Marathwada, Konkan, and Satara. He emphasized the need for assistance due to extensive damage to life, property, and agriculture.