साताऱ्याचा पारा ११ अंशाखाली, तीन अंशांनी घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 19:04 IST2021-02-09T19:02:43+5:302021-02-09T19:04:11+5:30

Winter Session Maharashtra Satara- सातारा जिल्ह्यात मागील आठवड्यापासून थंडी कायम असून किमान तापमानही कमी होत चालले आहे. मंगळवारी तर साताऱ्याचा पारा अनेक महिन्यानंतर ११ अंशा खाली आला. एका दिवसांत तीन अंशांनी किमान तापमान उतरल्याचे दिसून आले.

Satara's mercury dropped below 11 degrees, by three degrees | साताऱ्याचा पारा ११ अंशाखाली, तीन अंशांनी घसरला

साताऱ्याचा पारा ११ अंशाखाली, तीन अंशांनी घसरला

ठळक मुद्देसाताऱ्याचा पारा ११ अंशाखाली, तीन अंशांनी घसरला जिल्ह्यात थंडीची तीव्रता कायम

सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यापासून थंडी कायम असून किमान तापमानही कमी होत चालले आहे. मंगळवारी तर साताऱ्याचा पारा अनेक महिन्यानंतर ११ अंशा खाली आला. एका दिवसांत तीन अंशांनी किमान तापमान उतरल्याचे दिसून आले.

जिल्ह्यात गेल्यावर्षी थंडीला वेळेत सुरूवात झाली असलीतरी या ऋतुतील तापमानात सतत चढ-उतार होत आहे. कधी तापमान १२ अंशापर्यंत खाली येते. तर काहीवेळा २०, २१ अंशाच्यावरही तापमान जाते. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील नागरिक कधी थंडी तर कधी उकाड्यालाही सामोरे जात आहेत. मागीलवर्षी किमान सतत थंडी जाणवत होती. यंदा मात्र, तशी स्थिती राहिलेली नाही.

मागील आठ दिवसांपूर्वी जिल्ह्यातील किमान तापमान कधी १५, तर कधी १७ अंशापर्यंत पोहोचले होते. त्यानंतर ते १२ अंशापर्यंत खाली आलेले. परत ते वाढून १५ अंशावर गेले. आता तर पारा १४ अंशापर्यंत खाली आला आहे. तर सोमवारी साताऱ्यात १०.०७ किमान तापमान नोंदले गेले. त्यातच जिल्ह्यात थंडगार वारे वाहत आहेत. यामुळे गारठ्यात आणखी वाढ झालेली आहे. यामुळे शहराच्या ठिकाणच्या बाजारपेठेत सायंकाळच्या सुमारास गर्दी कमी होताना दिसून येत आहे. तसेच शेतीच्या कामावरही परिणाम झालेला आहे.

साताऱ्यातील किमान तापमान असे :

दि. २८ जानेवारी १४.०२, दि. २९ जानेवारी १४.०७, दि. ३० जानेवारी १४.०६ आणि ३१ जानेवारी १५.०१, दि. १ फेब्रुवारी १५, दि. २ फेब्रुवारी १७.०२, दि. ३ फेब्रुवारी १२.०९, ४ फेब्रुवारी १२.०१, ५ फेब्रुवारी १३.०५, दि. ६ व ७ फेब्रुवारी १४.०९, दि. ८ फेब्रुवारी १४ आणि ९ फेब्रुवारी १०.०७.
 

 

Web Title: Satara's mercury dropped below 11 degrees, by three degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.