शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Satara ZP Election 2026: सत्तेचा खेळ; राष्ट्रवादी-शिंदेसेनेच्या दबावात भाजपची रणनीती!

By नितीन काळेल | Updated: February 12, 2026 19:23 IST

महायुतीचीच सत्ता येणार; सोबत कोणाची हाच कळीचा प्रश्न

नितीन काळेलसातारा : सातारा जिल्हा परिषदेत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नसल्याने महायुती अंतर्गत पक्षांना एकत्र येऊनच सत्ता मिळवावी लागणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिंदेसेनेतून पावले पडू लागल्याने भाजपवर दबाव वाढला आहे. त्यातच निवडणुकीपूर्वी महायुतीसाठी प्रयत्न करणारे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही सावध भूमिका घेतल्याने भाजपला नवी रणनीती आखून सत्तेचं गणित मांडावं लागणार आहे. तसेच जिल्हा परिषदेत महायुतीचीच सत्ता येणार असलीतरी सोबत कोण असणार हाच कळीचा प्रश्न असणार आहे.सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. ६५ पैकी २७ जागा जिंकून भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला. तर दुसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार) पक्षाने २० जागा जिंकल्या. तसेच शिंदेसेनेने १५ जागा जिंकून तिसरे स्थान पटकावले. जिल्हा परिषदेची सत्ता मिळविण्यासाठी महायुतीतील किमान दोन पक्षांना एकत्र यावेच लागणार आहे. तरच बहुमताचा आकडा पार पडणार आहे.भाजप निवडणुकीत मोठा भाऊ ठरला असलातरी त्यांच्याशी हातमिळवणी करण्यासाठी सध्यातरी राष्ट्रवादी किंवा शिंदेसेना राजी नाही. उलट या दोन पक्षांच्या नेत्यांची एक गोपनीय बैठकही पार पडली. त्यामध्ये सत्तास्थापनेसाठी राजकीय खलबते झाली. एकत्र येऊन सत्ता घेणे इथपर्यंत राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेची चर्चा गेल्याची माहिती मिळत आहे. यामुळे भाजपपुढे सत्तेचं गणित जुळवणं अवघड झालेलं आहे.निवडणुकीत भाजपच्या नेत्यांकडून राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न झाला होता. त्यांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेतल्या होत्या. याची सल दोन्ही पक्षातील नेत्यांना आहे. त्यातच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीसाठी प्रयत्न केला होता. पण, भाजपकडून प्रतिसाद मिळाला नाही, हे पालकमंत्री देसाई यांनी वारंवार बोलून दाखवले आहे. त्यामुळे आता ते भाजपबरोबर सत्ता स्थापनेसाठी बोलणी करणार नाहीत हे त्यांच्या बोलण्यातून समोर येत आहे. त्यामुळे भाजपलाच पुढाकार घ्यावा लागेल.यासाठी एकाचवेळी भाजपला दोन्ही पातळीवर खिंड लढवावी लागेल. यातूनच भाजप एकीकडे राष्ट्रवादीबरोबर बोलू शकते. तर दुसरीकडे शिंदेसेनेकडे मदतीचा हात मागू शकते, अशीही चर्चा सुरू झाली आहे. कारण, सत्तेच्या काठावर असलेल्या भाजपला काहीही करून जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवयाचाच आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेने सत्तेसाठी पावले उचलली असलीतरी भाजपची रणनीती आणि गणितं ऐनवेळी बऱ्याच घडामोडी करू शकतात. यावरून येणारे काही दिवस हे राजकीय घडामोडीचेच ठरणार आहेत.

भाजपला पुढाकार घ्यावा लागेल...जिल्ह्यातील पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी महायुतीसाठी पुढाकार घेतला. पण, भाजपकडून प्रतिसादच मिळाला नाही. दोनवेळा प्रयत्न करूनही यश आले नाही. त्यामुळे पालकमंत्री तिसऱ्यांदा भाजपबरोबर युतीसाठी बोलतील असेतरी सध्या वाटत नाही. त्यामुळे कोंडीत असलेल्या भाजपलाच पुढाकार घ्यावा लागणार आहे.

भाजप अन् शिंदेसेनेचे वरिष्ठ निर्णय घेणार...राज्यात भाजप आणि शिंदेसेनेचे राजकीय कनेक्शन एकदम ओक्के आहे. त्यातच अनेक ठिकाणी दोघांनी एकत्र येत सत्ता मिळवली. त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेतही भाजप आणि शिंदेसेना एकत्र येऊ शकते. यासाठी दोन्ही पक्षांचे वरिष्ठच अंतिम निर्णय घेतील. त्यातून सत्ता वाटपाचा फाॅर्म्युला तयार होईल. पण, या घडामोडीत राष्ट्रवादीही काही तडजोडी करून सत्तेत कसे सहभागी होता येईल हेही अंदाज बांधू शकते. त्यामुळे जिल्हा परिषदेतील सत्तेसाठी महायुतीतील दोन पक्ष एकत्र येणार की तिघेजण सत्ता स्थापन करणार हे लवकरच समोर येणार आहे.शिंदेसेनेच्या नेत्यांशी भेट झाली. जिल्हा नियाेजन समिती कामांबाबत तसेच इतर काही प्राथमिक चर्चा झाली. आम्हाला आणि त्यांनाही वरिष्ठ नेत्यांचा विचारावे लागेल. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीबाबत अजून नोटिफिकेशन नाही. अजून याला सावकाश आहे. घाई करून काय करायचं. बघुया पुढे काय होतंय ते.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara ZP Election 2026: Power play amid NCP-Shinde Sena pressure!

Web Summary : Satara ZP sees a power struggle as no party has a majority. NCP and Shinde Sena's moves put pressure on BJP, requiring a new strategy for power. Alliances are crucial for forming the government.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६Satara areaसातारा परिसरMahayutiमहायुतीBJPभाजपाShambhuraj Desaiशंभूराज देसाईMakarand Patilमकरंद पाटील