शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याला रात्रभर पावसाने झोडपले !,विजांच्या कडकडाटात हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 13:55 IST

rain, satararnews, koynadam, सातारा जिल्ह्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालत असून आतापर्यंत सर्वत्र हजेरी लावली आहे. तर सोमवारी रात्री अकरानंतर सातारा शहराला पावसाने झोडपून काढले. विजांच्या कडकडाटात झालेल्या पावसामुळे काहीवेळ वीजपुरवठाही खंडित झाला होता. तर अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे कोयना धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसाताऱ्याला रात्रभर पावसाने झोडपले !,विजांच्या कडकडाटात हजेरीकोयनेलाही पाऊस; धरणातून विसर्ग सुरू

सातारा : जिल्ह्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालत असून आतापर्यंत सर्वत्र हजेरी लावली आहे. तर सोमवारी रात्री अकरानंतर सातारा शहराला पावसाने झोडपून काढले. विजांच्या कडकडाटात झालेल्या पावसामुळे काहीवेळ वीजपुरवठाही खंडित झाला होता. तर अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे कोयना धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

जिल्ह्यात परतीचा पाऊस पडू लागला आहे. शनिवारपासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होत आहे. सातारा, कऱ्हाड, पाटण, माण, खटाव, खंडाळा, वाई, कोरेगाव, महाबळेश्वर, फलटण जावळी या सर्वच तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. विशेष करुन दुष्काळी भागात परतीच्या पावसाचा जोर अधिक आहे. त्यातच आणखी काही दिवस पावसाची शक्यता आहे.शनिवारपासून पाऊस सुरू असून मंगळवारी पहाटेपर्यंत जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस झाला. तर मंगळवारी बहुतांशी भागात ढगाळ वातावरण होते. सोमवारी रात्री पावणे आकरानंतर सातारा शहराला पावसाने झोडपले.

ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात पाऊस कोसळत होता. ढगांच्या गडगडाटामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच वीजपुरवठाही खंडित झाला होता. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर वीज आली. शहरात मंगळवारी सायंकाळपर्यंत ढगाळ वातावरण होते. तरीही उकाडा वाढला होता.कोयनेच्या पायथा वीजगृहातून विसर्ग...जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा असल्याने कोयना धरण व्यवस्थापनने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पायथा वीजगृहातून प्रथम १०५० क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला. त्यानंतर मंगळवारी सकाळच्या सुमारास वाढ करुन तो २१०० क्यूसेक करण्यात आला.

मंगळवारी सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासांत कोयनेला १२, नवजा येथे ८ आणि महाबळेश्वरला २ मिलिमीटर पाऊस झाला. कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. सकाळच्या सुमारास धरणात १०४.६० टीएमसी पाणीसाठा होता. 

 

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरण