शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
3
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
4
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
5
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
6
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
7
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
8
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
9
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
10
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
11
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
12
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
13
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
14
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
15
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
16
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
17
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
18
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
19
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
20
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात

Satara Rains: साताऱ्यात अवकाळी पावसाचा कहर, वीज पडून गाय ठार, नारळानेही घेतला पेट

By नितीन काळेल | Updated: May 16, 2025 20:36 IST

Satara Unseasonal Rains: सातारा शहरासह तालुक्यात शुक्रवारी सकाळच्या सुमारास ढगांच्या गडगडाटात पावसाने जोरदार हजेरी लावली.

नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क: सातारा शहरासह तालुक्यात शुक्रवारी सकाळच्या सुमारास ढगांच्या गडगडाटात पावसाने एक तासभर जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सखल भागात पाणी साचले. त्याचबरोबर घरे, दुकाने आणिृ हॉटेलमध्ये पाणी शिरले. दरम्यान, फलटण तालुक्यात दोन ठिकाणी वीज कोसळली. एके ठिकाणी नाराळाच्या झाडाने पेट घेतला. तर कापडगावला वीज पडल्याने गाय ठार झाली. 

जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. तापमानातही मोठ्या प्रमाणात उतार आला आहे. त्याचबरोबर ढगाळ वातावरण तयार होत होते. त्यातच जिल्ह्यातील काही भागात पाऊसही झाला. पण, शुक्रवारी सकाळपासूनच जिल्ह्यात आभाळ भरुन आले. यामुळे काही भागात पाऊस पडला. सातारा शहरासह तालुक्यात तर सकाळी ११ पासूनच पावसाचे थेंब पडू लागले. त्यानंतर साडे आकरा वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाला सुरूवात झाली. ढगांच्या गडगडाटात पाऊस पडत होता. अर्धा तास जोरदार पाऊस झाला. त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाले तरीही रिपरिप सुरूच होती. दुपारी सवाबारानंतरच पाऊस एकदम कमी होत गेला. या पावसामुळे सातारा शहरातील सखल भागात पाणी साचले. तसेच खोलगट भागातील घरे, दुकाने आणि हाॅटेलात पाणी शिरले. 

सातारा तालुक्यातील वर्ये, लिंबखिंड परिसरात चांगला पाऊस झाला. जोरदार पावसामुळे समोरील वाहनही दिसत नव्हते. वाहने लाईट लावून जात होती. त्यातच वारा वाहत असल्याने पावसाचे पाणी घरे, हाॅटेलात शिरत होते. यामुळे दरवाजे बंद करण्याची वेळ आलेली. तसेच परिसरातील ओढ्याला पाणी वाहिले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र