शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील ५८० अपात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होणार; पगारही वसूल करणार?
2
आजचे राशीभविष्य - १५ एप्रिल २०२५, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिकदृष्टया लाभदायक दिवस
3
Palghar: पाणीटंचाईने प्रचंड हाल! हंडाभर पाण्यासाठी महिलांना जागावी लागते रात्र
4
मुंबईकरांचा लोकल प्रवास होणार 'सुपर कूल'; मध्य रेल्वेवर एसी लोकलच्या फेऱ्या वाढणार
5
तारीख पे तारीख... उशिराचा न्याय हादेखील अन्यायच होय!
6
राज्यपालांनी विधेयक अडवून धरल्यास राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडे यावे
7
Sankashti Chaturthi 2025: यंदा संकष्टीला म्हणा 'ही' आगळी वेगळी तरी सुरेल गणेश आरती!
8
विशेष लेख: नुसत्या आत्मपरीक्षणाने काँग्रेसचे प्रश्न संपतील?
9
दोन दिव्यांग मुलांचे पालक तिसरे मूल दत्तक घेऊ शकतात -मुंबई उच्च न्यायालय
10
ठाण्यातील उद्योजकांना खंडणीसाठी धमक्या ! पुण्यानंतर ठाण्यातही ‘माथाडीं’च्या नावाखाली छळवणूक
11
Mehul Choksi: स्वित्झर्लंडला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच ठोकल्या बेड्या
12
मुंबई-गोवा हायवे जूनपर्यंत पूर्ण होणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती
13
Heat Wave in Maharashtra: महाराष्ट्रातील ‘हिल’ स्टेशन्सची वाटचाल ‘हीट’ स्टेशन्सकडे
14
Mumbai: खासगी टँकर, विहिरी आणि कूपनलिकांना मुंबई महापालिकेचा दिलासा
15
Mumbai Temperature: महामुंबई दिवसेंदिवस होतेय ‘ताप’दायक; पारा पोचला ४० अंशांपार
16
"आता टोलबद्दल तुमची तक्रार राहणार नाही, १५ दिवसांत नवीन पॉलिसी..."; नितीन गडकरींचे मोठं विधान
17
बिहार विजयाचे BJPचे स्वप्न धुसर होणार? बड्या मित्रपक्षाचा NDAला रामराम; INDIA आघाडीत जाणार!
18
“उद्धव ठाकरे यांना राऊतांपासून खरा धोका, तेच पक्ष चालवतात”; शिंदेंच्या नेत्याने सगळेच काढले
19
'मॅन ऑफ द मॅच' ठरल्यावर धोनीही सरप्राइज! नवा इतिहास रचला अन् कोहलीच्या विक्रमाशीही बरोबरी
20
"माझी आई मला म्हणाली होती, नितीन एवढा रस्ता चांगला कर; म्हणून मी आज...!" गडकरींनी सांगितली आईनं व्यक्त केलेली इच्छा

Satara: सातारा जिल्ह्यासाठी आयटी पार्क, स्कील सेंटर देणार, उदय सामंत यांचं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2023 16:49 IST

Uday Samant: पर्याय नसतो म्हणून आपण नोकरी मागतो पण नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे बना. शिंदे-फडणवीस सरकारने १३ हजार उद्योजक निर्माण केले असून आगामी काळात मोठ्या संख्येने रोजगार निर्मितीही करणार आहे. सातारा जिल्ह्यासाठीही आयटी पार्कबाबत विचार करू.

सातारा - पर्याय नसतो म्हणून आपण नोकरी मागतो पण नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे बना. शिंदे-फडणवीस सरकारने १३ हजार उद्योजक निर्माण केले असून आगामी काळात मोठ्या संख्येने रोजगार निर्मितीही करणार आहे. सातारा जिल्ह्यासाठीही आयटी पार्कबाबत विचार करू. शिवाय लवकरच स्कील सेंटर, कामगारांच्या रुग्णालयास जागा, एमआयडीसीसाठी प्रादेशिक अधिकारी देण्याची अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने व खासदार उदयनराजे यांच्या संकलपनेतून सातारा येथील यशोदा कॅम्पस मध्ये महा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले हाेते. यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, पोलीस अधिक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, माजी आमदार आनंदराव पाटील, माजी सभापती सुनील काटकर, राजेंद्र यादव, यशोदाचे संस्थापक प्रा. दशरथ सगरे, उद्योग विभागाचे सहसंचालक सदाशिव सुरवसे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक उमेशचंद्र दंडगव्हाळ आदी उपस्थित होते.

यावेळी उदय सामंत म्हणाले, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय उद्योग विभागाने घेतला आहे. रोजगार निर्मितीबरोबरच  उद्योजकांची निर्मिती करायची आहे. येत्या वर्षभरात २५ हजार उद्योजक निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. टुरीझमसाठी उद्योग विभागाने साह्य देण्याचा निर्णय घेतला आहे. युवकांनी मिळालेली नोकरी प्रामाणिकपणे करण्याबरोबरच स्वत:चा व्यवसाय सुरू होईल याकडे लक्ष द्यावे.

यावेळी उदयनराजे भोसले म्हणाले, आपला भविष्यकाळ हा आपल्या हातात असतो. त्यामुळे युवकांनी आपले ध्येय ठरवावे, जिद्दीने पाठपुरावा करावा. नोकरी मागणारे नव्हे तर देणारे व्हावे. संधी एकदाच दार ठोठावते. परत येत नाही. आपल्याला इतिहासजमाव्हायचं नाही. ही तरुणाई म्हणजेच माझा सातबारा आहे. मंत्री सामंत तसेच माझ्याकडून जे सहकार्य लागेल ते करू. त्यात कुठेही कमी पडणार नाही पण तुम्हीही कमी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले.

प्रारंभी संग्राम बर्गे यांनी प्रास्ताविक केले. नोकरीची संधी मिळालेल्या उमेदवारांना प्रातिनिधीक स्वरुपात नियुक्ती पत्र, जिल्हास्तरीय लघूउद्योग पुरस्कारांचे वितरण व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातील लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात कर्ज वाटपाचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

तुमच्या हेलिकॉप्टरमधून सामंत यांना भेटायला जाईनया जिल्ह्याने देशाला नेतृत्व दिले. पत्रीसरकार, स्त्री शिक्षणाची चळवळ, सत्यशोधक चळवळ अनेक चळवळी या जिल्ह्यात झाल्या. याची जाणीव ठेवून मोठे व्हा. मंत्री सामंत येथे हेलिकॉप्टरने आले आहेत. तुम्हीही मोठे व्हा अन् तुमचेही हेलिकॉप्टर असूदे. मग मी माझे मित्र सांमत यांना भेटायला तुमच्याच हेलकॉप्टरमधून जाईन, असेही खा. उदयनराजे म्हणाले.

रिकामे असणाऱ्यांकडून आरोप करण्याचे उद्योगवेदांता फाॅक्सकॉन, एअर बस प्रकल्प राज्यातून गेल्याची टीका करण्यात येत आहे. पण ज्यांना सध्या काहीच उद्योग नाही ते पत्रकार परिषदा घेवून राज्य असे उद्याेग करत आहेत. वेदांता शिंदे-फडणवीस सरकारमुळे गेला नाही. तो अगोदरच गेला होता. पण एका वर्षात त्याच्या दुप्पट रोजगार निर्माण केल्याशिवाय राहणार नाही, असे सामंत म्हणाले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतSatara areaसातारा परिसर