सातारा : शॉक लागून महावितरणचे दोन कर्मचारी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 14:13 IST2018-07-31T14:12:54+5:302018-07-31T14:13:21+5:30
महामार्गालगत खेड परिसरात असणाऱ्या विद्युत खांबावर दुरुस्तीचे काम करत असताना मंगळवारी दुपारी अकरा वाजता शॉक लागून दोन कर्मचारी जखमी झाले.

सातारा : शॉक लागून महावितरणचे दोन कर्मचारी जखमी
सातारा : महामार्गालगत खेड परिसरात असणाऱ्या विद्युत खांबावर दुरुस्तीचे काम करत असताना मंगळवारी दुपारी अकरा वाजता शॉक लागून दोन कर्मचारी जखमी झाले.
याबाबत माहिती अशी की, पुणे-बेंगलोर महामार्गावर महेंद्र हॉटेलच्या शेजारी असणाऱ्या महावितरण कंपनीच्या डीपीवर मंगळवारी सकाळी अकरा वाजता दुरुस्तीचे काम सुरू होते.
दुरुस्तीचे काम करण्यासाठी महावीर भरत गुरव (वय २७, रा. संगमनगर, ता. सातारा) व एकनाथ विठ्ठल शिंदे (वय ५६, रा. भीमनगर, सातारारोड ता. कोरेगाव) हे खांबावर चढले होते.
यावेळी खांबावर विजेचा शॉक लागल्याने दोघे जखमी झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.