शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : पसरणीचा घाट.. वणव्यात खाक, विघ्नसंतोषी व्यक्तींकडून वणवे लावण्याचे प्रकार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 17:27 IST

वाई-पाचगणीला जोडणाऱ्या पसरणी घाटात विघ्नसंतोषी व्यक्तींकडून वणवे लावण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. सोमवारी लागलेल्या वणव्यात घाटातील वृक्षसंपदा मोठ्या प्रमाणात जळून खाक झाली. या वणव्यामुुळे पशुपक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले असून, पर्यावरणप्रेमींमधून नाराजी व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देविघ्नसंतोषी व्यक्तींकडून वणवे लावण्याचे प्रकार सुरू वणव्यामुुळे पशुपक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात

वाई : वाई-पाचगणीला जोडणाऱ्या पसरणी घाटात विघ्नसंतोषी व्यक्तींकडून वणवे लावण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. सोमवारी लागलेल्या वणव्यात घाटातील वृक्षसंपदा मोठ्या प्रमाणात जळून खाक झाली. या वणव्यामुुळे पशुपक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले असून, पर्यावरणप्रेमींमधून नाराजी व्यक्त होत आहे.वाईहून पाचगणी व महाबळेश्वरला जाण्यासाठी पसरणी घाटातूनच जावे लागते. या मार्गावरून कोकणाकडे जात येत असल्याने घाटातून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. जैवविविधतेने नटलेल्या या घाटात अनेक दुर्मीळ वृक्ष व पशुपक्ष्यांचा अधिवास आहे. मात्र, विघ्नसंतोषी व्यक्तींमुळे वृक्षसंपदा व पक्ष्यांच्या अधिवासावर कृत्रिम संकट निर्माण झाले आहे.घाटात वणवे लावण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. सोमवारी घाटात लावण्यात आलेल्या वणव्यात गवत तसेच शेकडो वृक्ष जळून खाक झाले. तसेच पक्ष्यांची घरटीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या घटनेमुळे पर्यावरणप्रेमींमधून नाराजी व्यक्त होत आहे. वनविभागाने वणवे लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच डोंगरात अत्यावश्यक ठिकाणी जाळ पट्टे तयार करावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआगbirds sanctuaryपक्षी अभयारण्य