शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : म्हशी चोरी प्रकरणात तिघांना पकडण्यात यश, मुख्य सूत्रधार फरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 13:46 IST

खटाव, माण तालुक्यांच्या विविध भागातील शेतकऱ्यांच्या गोठ्यातील म्हशी चोरून मिरजमधील कत्तलखान्यांमध्ये विक्री करणाऱ्या दोघांसह एक व्यापाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देम्हशी चोरी प्रकरणात तिघांना पकडण्यात यश, मुख्य सूत्रधार फरारी वाहन ताब्यात; माण, खटाव तालुक्यांतील चोरी

मायणी : खटाव, माण तालुक्यांच्या विविध भागातील शेतकऱ्यांच्या गोठ्यातील म्हशी चोरून मिरजमधील कत्तलखान्यांमध्ये विक्री करणाऱ्या दोघांसह एक व्यापाऱ्याला अटक करण्यात आली आहे. तसेच चोरीच्या म्हशी नेण्यासाठी वापरलेले वाहनही ताब्यात घेण्यात मायणी पोलिसांना यश आले आहे. तर या प्रकरणातील मुख्य सूत्रधार फरारी असून, पोलीस त्याच्या मागावर आहेत.याबाबत मायणी पोलीस दूरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, वडूज, म्हसवड व औंध पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असणाऱ्या गावांतील म्हशी चोरणारी टोळी सक्रिय झाली होती.

सुमारे आठ म्हशी चोरीला गेल्याची माहिती मिळाली होती. यामुळे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत काळे, पोलीस निरीक्षक यशवंत शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तयार केले.माहितीगारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे विटा (जि. सांगली) येथील धीरज राजू पवार व अश्विनकुमार संजय कदम यांना अटक केली. त्यानंतर त्यांनी चोराडे येथील दोन, विखळेतील दोन व ढोकळवाडी (ता. खटाव) येथील एक आणि कुकुडवाड (ता. माण) येथील एक अशा सहा म्हशी चोरल्याची कबुली दिली.तसेच या चोरीच्या म्हशी मिरज (जि. सांगली) येथील कत्तलखान्यांमध्ये नेण्यासाठी वापरण्यात येत असलेले वाहन (एमएच १० बीआर ४४०२) ताब्यात घेण्यात आले. कत्तल खान्यांमधील एजंट तासीव निसार वड्डीला ताब्यात घेण्यात आले आहे. याचा मुख्य सूत्रधार संतोष विठ्ठल वायदंडे हा फरारी आहे.याकामी गुलाब दोलताडे, सुरेश हांगे, अरुण बुधावले, बापूराव खांडेकर, नवनाथ शिरकुळे, प्रकाश कोळी, विठ्ठल पवार, चंद्रकांत वाघमारे व विकास जाधव सहभागी झाले होते. सहायक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी हे अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस