शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

सातारा : पाण्यासाठी नागरिकांचा रास्ता रोको करंजे नाक्यावर आंदोलन : प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 11:07 PM

सलग दहा दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने निसर्ग कॉलनी व स्वरूप कॉलनीतील संतप्त महिलांनी बुधवारी करंजे नाका येथे रास्ता रोको केला. पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन दुरुस्त न केल्याने

ठळक मुद्देउदयनराजेंच्या मध्यस्थीनंतर आंदोलन स्थगित पाणीपुरवठ्यात हलगर्जीपणा केल्यास कदापि खपवून घेणार नाही, असा इशारा देत काम तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना केल्या.

सातारा : सलग दहा दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने निसर्ग कॉलनी व स्वरूप कॉलनीतील संतप्त महिलांनी बुधवारी करंजे नाका येथे रास्ता रोको केला. पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन दुरुस्त न केल्याने नागरिकांनी जीवन प्राधिकरणच्या अधिकाºयांना घेराव घातला. या घटनेची माहिती मिळताच खा. उदयनराजे भोसले यांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच पाणीपुरवठ्यात हलगर्जीपणा केल्यास कदापि खपवून घेणार नाही, असा इशारा देत काम तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना केल्या.

शहरात पालिकेच्या वतीने भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. या कामामुळे ठिकठिकाणी रस्ता खुदाई केली जात आहे. हे काम सुरू असताना काही दिवसांपूर्वी निसर्ग व स्वरूप कॉलनीला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. त्यामुळे या भागाला होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला. नागरिकांनी या घटनेची माहिती तातडीने जीवन प्राधिकरणच्या अधिकाºयांना दिली. मात्र, प्राधिकरणकडून दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले. पाण्याचा प्रश्न बिकट झाल्याने बुधवारी संतप्त महिला व नागरिकांनी करंजे नाका येथे रास्ता रोको आंदोलन केले.

रास्ता रोकोमुळे काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या आंदोलनाची माहिती मिळताच जीवन प्राधिकरणच्या अधिकाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु नागरिक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. नागरिकांनी त्यांच्यापुढे प्रश्नांचा पाढाच वाचला. हा वाद विकोपाला गेल्याने खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, बाळासाहेब ढेकणे घटनास्थळी आले. यावेळी नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांनी जीवन प्राधिकरणच्या अधिकाºयांची कानउघडणी केली. पाणीपुरवठा दुपारपर्यंत पूर्ववत करण्याच्या सूचना देऊन कामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. उदयनराजेंच्या मध्यस्थीनंतर आंदोलन स्थगित झाले... आता मीच सांगणार अधिकाºयांना चोपून काढा‘प्राधिकरणच्या हद्दीत कुठे अडचणी निर्माण झाल्यास त्याची तातडीने सोडवणूक करावी. एखादी पाईपलाईन तुम्ही मार खाल्ल्यानंतर दुरुस्त करणार आहात का? ज्यासाठी आपली नेमणूक झाली आहे, ती कामे जबाबदारीने पूर्ण करा. आता कामे झाली नाहीत तर नागरिकांना मीच सांगणार आहे, सर्व अधिकाºयांना चोपून काढा. लोकांना पाणी मिळत नसेल तर ते काय करणार. कोणत्याच कामात मी हलगर्जीपणा खपवून घेणार नाही,’ अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी जीवन प्राधिकरणच्या अधिकाºयांचा समाचार घेतला.दोन दिवसांत दुरुस्ती करणार..प्रतापगंज पेठेतील नामदेव वस्ती परिसराचा पाणीपुरठा गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत झाला आहे. येथील नागरिकांनी बुुधवारी राधिका चौकात रास्ता रोको आंदोलन केले. या भागाला जीवन प्राधिकरणच्या वतीने पाणीपुरवठा केला जातो. आंदोलनाची माहिती मिळताच प्राधिकरणचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. येत्या दोन दिवसांत पाईपलाईनला लागलेली गळती काढण्याचे आश्वासन अधिकाºयांनी दिले.पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने निसर्ग कॉलनी व स्वरूप कॉलनीतील संतप्त नागरिकांनी बुधवारी करंजे नाका परिसरात रास्ता रोको करून जीवन प्राधिकरणच्या अधिकाºयांना घेराव घातला. दुसºया छायाचित्रात खासदार उदयनराजे भोसले यांनी नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन पाणीपुरवठा तातडीने पूर्ववत करण्याच्या सूचना प्राधिकरणच्या अधिकाºयांना दिल्या.

 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईStrikeसंपUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले