सातारा : पिसाळलेल्या कुत्र्याचा सात जणांना चावा, लोणंदमध्ये घबराट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 13:18 IST2018-09-01T13:16:22+5:302018-09-01T13:18:55+5:30

लोणंद शहरातील काही भागात शनिवारी सकाळपासून एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला. त्याने सकाळी आठ ते दहा या दोन तासांत सातजणांच्या पायाचा चावा घेतला. यामध्ये शाळेतील तीन मुली व एका मुलाचा समावेश आहे.

Satara: Seven snakes of lewd dogs, bitter in lonand and panic in Lonand | सातारा : पिसाळलेल्या कुत्र्याचा सात जणांना चावा, लोणंदमध्ये घबराट

सातारा : पिसाळलेल्या कुत्र्याचा सात जणांना चावा, लोणंदमध्ये घबराट

ठळक मुद्दे पिसाळलेल्या कुत्र्याचा सात जणांना चावालोणंदमध्ये घबराट; तीन शाळकरी विद्यार्थिनींचा समावेश

लोणंद (सातारा) : लोणंद शहरातील काही भागात शनिवारी सकाळपासून एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला. त्याने सकाळी आठ ते दहा या दोन तासांत सातजणांच्या पायाचा चावा घेतला. यामध्ये शाळेतील तीन मुली व एका मुलाचा समावेश आहे.

पूर्वा संजय वाघोळे (वय १२), ॠतुजा संजय वाघोळे (१५), मंदा अशोक कोरडे ( ५०), आरती अमित खरात (२५), शुभम जालिंदर माने (४७, सर्व रा. लोणंद), चेतन बाळासाहेब मदने (१५, रा. कोरेगाव, फलटण), नेहा साहेबराव चव्हाण (७, रा. निंभोरे, ता. फलटण) असे जखमींची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी की, येथील शिवाजी चौक परिसरात शनिवारी सकाळी एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला. कुत्र्याने शाळेत जाणाऱ्या तीन विद्यार्थिनी, एक शाळकरी मुलगा व तीन महिलांना चावा घेतला.

कुत्र्याच्या दहशतीमुळे लोणंद परिसरात भीतीचे वातावरण आहे. सातजणांवर जिल्हा आरोग्य केंद्र्रात औषधोपचार करण्यात आले. ही माहिती समजल्यानंतर तातडीने या कुत्र्याच्या बंदोबस्त करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या.

Web Title: Satara: Seven snakes of lewd dogs, bitter in lonand and panic in Lonand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.