सातारा : निनाम परिसरात बिबट्याची दहशत, पाच दिवसांत चार कुत्र्यांचा पाडला फडशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 13:43 IST2018-08-20T13:41:33+5:302018-08-20T13:43:07+5:30
सातारा तालुक्यातील निनाम गाव परिसरात गेल्या आठवड्यापासून बिबट्याचा वावर वाढला आहे. त्याने पाच दिवसांत परिसरातील चार कुत्र्यांचा फडशा पाडला असून, बिबट्याने शिवारातील उसाच्या शेतात मुक्काम ठोकल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

सातारा : निनाम परिसरात बिबट्याची दहशत, पाच दिवसांत चार कुत्र्यांचा पाडला फडशा
सातारा : तालुक्यातील निनाम गाव परिसरात गेल्या आठवड्यापासून बिबट्याचा वावर वाढला आहे. त्याने पाच दिवसांत परिसरातील चार कुत्र्यांचा फडशा पाडला असून, बिबट्याने शिवारातील उसाच्या शेतात मुक्काम ठोकल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
निनाम-कुसवडे रस्त्यावर लेंडा नावाच्या शिवारात गेल्या महिन्यापासून बिबट्याचा वावर आहे. बिबट्याने शिवारात राहणाऱ्या वस्तीतील कुत्री व शेळ््यांवर हल्ला चढवला. यात आत्तापर्यंत चार कुत्री व दोन शेळ््यांचा फडशा पाडला आहे. सध्या शेतातील कामांची धामधूम असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
वनविभागाने घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरात वनरक्षकांची नेमणूक केली आहे. त्यांच्या माध्यमातून बिबट्याचा मार्ग काढण्यात आला असून, बिबट्या शिवारातील उसाच्या शेतामध्ये वास्तव्य असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे वनविभागाकडून पिंजरा लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच परिसरात पिंजरा लावण्यात येणार असल्याचे वन अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.