शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी येत नाही अन् बोलणार पण नाही" असं म्हणणाऱ्या भोजपुरी अभिनेता पवन सिंहचा भाजपात प्रवेश
2
फिलीपीन्समध्ये भयानक भूकंप: ६.९ तीव्रतेचा धक्का, ६० जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या
3
मी आठ युद्धे थांबवली, नोबेल न मिळाल्यास..; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
4
फेरारी कार नाही, फेरारी कंपनीच्या मालकीवरून आई-मुलगा पुन्हा आमनेसामने; आजोबांचे नवे मृत्यूपत्र समोर आले अन्...
5
आम्हाला अजूनही अटकेच्या आदेशाची प्रत मिळाली नाही; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचा दावा
6
Video - "एक, दोन रुपये तरी द्या..."; इन्फ्लुएन्सर iPhone 17 Pro Max घेण्यासाठी मागतेय डोनेशन
7
कोण आहेत आशीष पांडे आणि कल्याण कुमार? मोदी सरकारनं 'या' पदावर केली नियुक्ती
8
RBI MPC Policy Live: दिवाळीत कर्ज महागच! EMI कमी होण्याची वाट पाहणाऱ्यांचा भ्रमनिरास; रेपो दर 'जैसे थे'
9
मूर्ती लहान पण कीर्ती महान! पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली; ऑस्ट्रेलियाविरुद्ध विक्रमी शतक
10
Zubeen Garg : "७ दिवसांत बाहेर येईल मृत्यूमागचं सत्य"; सिंगर झुबीन गर्गच्या पत्नीच्या संशयावरुन मॅनेजरला अटक
11
Asia Cup 2025: ' ट्रॉफी पाहिजे तर...',  बैठकीतील राड्यानंतर एसीसी अध्यक्ष नक्वी तयार, पण आता ठेवली नवीनच अट...
12
७५ वर्षाचा नवरदेव अन् ३५ वर्षाची नवरी; लग्नाच्या रात्रीच वृद्ध पतीचा मृत्यू, घातपाताचा संशय
13
AUS W vs NZ W, ICC Women’s World Cup 2025, Live Streaming : न्यूझीलंडसमोर ऑस्ट्रेलियाचे तगडे आव्हान, कारण...
14
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांकडूनची वसूली, ऊसासाठी प्रतिटन १५ रुपये कपात; राजू शेट्टींचा हल्लाबोल
15
"माझ्या वडिलांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...", 'बिग बॉस'च्या घरात अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली- "मी त्यांना..."
16
बनावट नोटाचा 'बाजार'; कोणत्या राज्यात सर्वाधिक छपाई, महाराष्ट्र कोणत्या गुन्ह्यांमध्ये पहिला?
17
आजपासून UPI पेमेंटचं महत्त्वाचं फीचर बंद; आता थेट पैसे मागता येणार नाहीत!
18
Sonam Kapoor Pregnant: दुसऱ्यांदा आई होणार सोनम कपूर? 'वायू'च्या जन्मानंतर कुटुंबात पुन्हा चिमुकल्या पाहुण्याची चाहुल
19
अनिल देशमुखांवर झालेला 'तो' हल्ला बनावट; पोलिसांच्या बी समरी रिपोर्टमधून धक्कादायक दावा
20
1 October 2025 Rules Change: रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते UPI पेमेंट पर्यंत, आजपासून झाले 'हे' महत्त्वाचे ८ बदल

गणेशोत्सवाची लगबग; सातारकरांना डीजेच्या आवाजाची धास्ती, ३०० हून अधिक इमारती धोकादायक

By सचिन काकडे | Updated: August 13, 2025 16:10 IST

राजपथावरील 'त्या' घटनेच्या आठवणी आजही जाग्या..

सचिन काकडेसातारा : गणेशोत्सवाची लगबग सुरू असताना, डीजेच्या कर्णकर्कश आवाजाची सातारकांनी धास्ती घेतली आहे. पहिल्याच आगमन मिरवणुकीत डीजेच्या दणक्याने मिरवणूक मार्गावरील अनेक इमारती हादरल्या. यातील काही इमारती तर इतक्या जुन्या आणि धोकादायक आहेत की त्या कोणत्याही क्षणी कोसळू शकतात. यंदाच्या उत्सवातही मोठ्या आवाजाची भिंत उभी राहिली तर ११ वर्षांपूर्वी राजपथावरील 'त्या' दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.

राजपथावरील 'त्या' घटनेच्या आठवणी आजही जाग्या..सप्टेंबर २०१४ चा दिवस सातारकरांच्या मनात अजूनही ताजा आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत, डीजेच्या अतितीव्र आवाजाने राजपथावरील एका इमारतीची भिंत कोसळली होती. या भीषण दुर्घटनेत तीन निष्पाप जिवांचा बळी गेला. चंद्रकांत भिवा बोले, उमाकांत गजानन कुलकर्णी आणि गजानन श्रीरंग कदम या तिघांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर सातारकरांनी माणुसकी दाखवत सर्व सण-उत्सवामधून डीजेला कायमचे हद्दपार केले होते.

८ इमारती अतिधोकादायकनगरपालिकेच्या नोंदीनुसार, साताऱ्यात ३०० हून अधिक इमारती धोकादायक आहेत. त्यापैकी मिरवणूक मार्गावरील १५२, १५५ सदाशिव पेठ, पंचमुखी गणेश मंदिर, कमानी हौद ते शेटे चौक, शेटे चौक, प्रतापगंज पेठ येथे ८ इमारती अतिधोकादायक आहेत.

..तर कुणाची जबाबदारी?सोहळ्यात डीजेचा वापर झाल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतात? एखादी दुर्घटना घडली, तर त्याचे बळी कोण असतील? याला जबाबदार कोण? हे प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत. तरुणांनी केवळ आपल्या आनंदासाठी इतरांच्या जीवाशी खेळू नये, असा विचार करण्याची वेळ आता आली आहे.

पुन्हा एकदा डीजेची भिंत..

  • ११ वर्षांनंतर पुन्हा एकदा साताऱ्यात तरुणांच्या हट्टापायी डीजेची भिंत उभी राहिली आहे. आगमन मिरवणुकीत डीजेच्या आवाजाची तीव्रता अनेकांना जाणवली.
  • या दणक्यामुळे लोकांच्या काळजाचा ठोका चुकला आणि अनेकांना २०१४ च्या घटनेची आठवण झाली. हाताच्या बोटावर मोजण्याइतकी मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा आग्रह धरला आहे, काही मंडळांनी डीजेला प्राधान्य दिले आहे.

राजपथावर घडलेली ती घटना कधीही न विसरणारी आहे. डीजे वाजला नसता तर कदाचित ही घटना घडली नसती. विसर्जन मार्गावर आजही अनेक धोकायदायक इमारती आहेत. त्यामुळे गणेश मंडळांनी डीजे ऐवजी पारंपरिक वाद्यांचा आग्रह धरायला हवा. मिरवणूक सोहळ्यात जर एखार्दी इमारत कोसळली तर त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते. - प्रेरणा बेलोशे, सातारा 

सण, उत्सव आनंदासाठी व मनाच्या शांततेसाठी असतात. या उत्सवांमध्ये कर्णकर्कश आवाज, गोंगाट करून श्रद्धा सिद्ध होत नाही. ध्वनिप्रदूषणाचा वृद्ध, रुग्ण, गरोदर महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होता. हे समजावून घेऊन मंडळांनी ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. - शिवाजी राऊत, सामाजिक कार्यकर्ते