शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

सातारा : हजारो महिलांचा कोरड्या ओढ्यात शिव्यांचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 8:05 PM

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील वेगळेपण जपणारा बोरीचा बार गुरुवारी खंडाळा तालुक्यातील सुखेड-बोरी गावाच्या सीमेवर रंगला. सुखेड-बोरी दोन गावांतील महिलांनी गावच्या सीमेवरील ओढ्याजवळ येऊन एकमेकींना शिव्यांची लाखोली वाहिली.

ठळक मुद्देहजारो महिलांचा कोरड्या ओढ्यात शिव्यांचा पाऊससुखेड-बोरीत रंगला बोरीचा बार; विविध भागांतील लोकांची हजेरी

खंडाळा (सातारा) : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील वेगळेपण जपणारा बोरीचा बार गुरुवारी खंडाळा तालुक्यातील सुखेड-बोरी गावाच्या सीमेवर रंगला.

सुखेड-बोरी दोन गावांतील महिलांनी गावच्या सीमेवरील ओढ्याजवळ येऊन एकमेकींना शिव्यांची लाखोली वाहिली. यावर्षी पाऊस नसल्याने ओढ्याला पाणी नव्हते. त्यामुळे हजारो महिलांनी कोरड्या ओढ्यातच शिव्यांचा पाऊस पाडला.सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी शिव्यांची लाखोली वाहण्याचीच परंपरा आहे. सुखेड-बोरी या दोन गावांच्या दरम्यान असलेल्या ओढ्यालगत दरवर्षी नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी बोरीचा बार रंगतो. एकमेकींना शिव्या दिल्या जातात. संगतीला हलगीचा कडकडाट सुरू असतो. दोन्ही बाजूंकडील महिलांमध्ये उत्साह संचारतो अन् प्रतिस्पर्धी गटातील महिलेला ओढून आणले जाते.सुखेड व बोरी या दोन्ही गावांतील शेकडो महिलांनी वाजत-गाजत ग्रामदेवताचे दर्शन घेऊन पूजा केली. त्यानंतर गावाच्या वेशीवरील सरहद्देच्या ओढ्यावर गुरुवारी दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी बोरीचा बार सुरू झाला. तो पाऊण तास चालला.

जगावेगळा हा सोहळा पाहण्यासाठी जिल्ह्याच्या विविध भागातून शेकडो लोक दाखल झाले होते. अनेक तरुणांनी हा सोहळा आपल्या मोबाईलमध्येही कैद केला. या सोहळ्यानंतर दोन्ही गावांमध्ये यात्रेला सुरुवात झाली.ओढ्याच्या दोन्ही किनाऱ्यांवरून महिलांनी एकमेकींना हातवारे करत ओढ्याच्या पात्रात उतरल्या. परंतु पात्रात पाणी नसल्याने अस्सल गावारान शिव्यांची लाखोली वाहिली. सुमारे पाऊण तास एकमेकींना शिव्या देऊन हा अनोखा उत्सव साजरा करण्यात आला. लोणंद पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमSatara areaसातारा परिसर