शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
3
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
4
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
5
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
6
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
7
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
8
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
9
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
10
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
11
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
12
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
14
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
15
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
16
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
17
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
20
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका

सातारा : धरणक्षेत्रात पाऊस जोर धरु लागला, कोयनेत ३१ मिलीमिटर पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 13:53 IST

गेल्या आठ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने जिल्ह्यात पुन्हा सुरूवात केली असून धरण क्षेत्रात हळूहळू जोर धरला आहे. कोयनानगर येथे गेल्या २४ तासांत ३१ मिलीमिटर पाऊस झाला आहे. तर पूर्व भागात हलक्या सरी कोसळत आहेत.

ठळक मुद्देधरणक्षेत्रात पाऊस जोर धरु लागलापूर्व भागात हलक्या सरी : कोयनेत ३१ मिलीमिटर पाऊस

सातारा : गेल्या आठ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने जिल्ह्यात पुन्हा सुरूवात केली असून धरण क्षेत्रात हळूहळू जोर धरला आहे. कोयनानगर येथे गेल्या २४ तासांत ३१ मिलीमिटर पाऊस झाला आहे. तर पूर्व भागात हलक्या सरी कोसळत आहेत.मान्सूनचे वेळेत आगमन झाले असताना सुरूवातीच्या काही दिवसांत चांगला पाऊस झाला. दुष्काळी भागातही पाणी वाहिले. पण, त्यानंतर पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे ढग दाटून आले. खरीप हंगामातील पेरणी वेळेत होणार का याकडे लक्ष लागले होते.

आता काही दिवसांच्या दडीनंतर पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. सातारा शहरासह परिसरात शनिवारी सायंकाळपासून पावसाची रिमझिम सुरू आहे. सोमवारी सकाळीही हलकासा पाऊस झाला. तर दुष्काळी भागातील काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या.पावसाचा खरा परिणाम होतो तो धरणातील पाणीसाठ्यावर. पाऊस वेळेत झाला साठ्यात वाढ होऊन धरणे लवकर भरतात. यंदा अद्यापही धरणात पाण्याची आवक झालेली नाही. असे असलेतरी सध्या सुरू असलेल्या पावसाने रात्रीपासून धरणक्षेत्रात हळूहळू जोर धरल्याचे दिसत आहे. यामुळे लवकरच धरणात पाण्याची आवक होण्यास सुरूवात होणार आहे.सोमवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ३१ मिलीमिटर पाऊस झाला. तर रविवारी सकाळपर्यंत येथे अवघा १४ मिलीमिटर पाऊस झालेला. त्यामुळे कोयना परिसरात पाऊस जोर धरत असल्याचे दिसत आहे.धरणक्षेत्रातील २४ तासांतील व कंसात एकूण पाऊस

  1. धोम ०६ (५३)
  2. कोयना ३१ (३४७)
  3. बलकवडी १९ (१४७)
  4. कण्हेर ०५ (३३)
  5. उरमोडी १० (४३)
  6. तारळी ३० (८३)
टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Satara areaसातारा परिसरRainपाऊसDamधरण