शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : सज्जनगडावर श्रीराम जय रामचा गजर, हजारो भाविकांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 13:13 IST

श्रीराम जय राम जय जय राम आणि जय जय रघुवीर समर्थच्या नामघोषात ३३६ व्या दासनवमी महोत्सवास सज्जनगडावर प्रारंभ झाला. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते. यानिमित्ताने श्री रामदास स्वामी संस्थान आणि समर्थ सेवा मंडळाच्या वतीने नऊ फेब्रुवारीपर्यंत म्हणजे दासनवमीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देश्रीराम जय राम जय जय राम आणि जय जय रघुवीर समर्थच नामघोषसमाधीची षोडशोपचारे पूजासमर्थ संप्रदायाचे महंत, मठपती, मानकरी उपस्थित भजनाच्या नामघोषात शिंग, तुतारीच्या गजरात छबिना

सातारा : श्रीराम जय राम जय जय राम आणि जय जय रघुवीर समर्थच्या नामघोषात ३३६ व्या दासनवमी महोत्सवास सज्जनगडावर प्रारंभ झाला. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते. यानिमित्ताने श्री रामदास स्वामी संस्थान आणि समर्थ सेवा मंडळाच्या वतीने नऊ फेब्रुवारीपर्यंत म्हणजे दासनवमीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सातारा तालुक्यातील सज्जनगड येथील मुख्य समाधी मंदिरात गुरुवारी पहाटे पाच वाजता काकड आरती करण्यात आली. समर्थ रामदास स्वामींच्या समाधीची षोडशोपचारे पूजा समर्थ रामदास स्वामीचे वंशज, महंत, मठपती, सेवा मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. सकाळी आठ वाजता अध्यक्ष व अधिकारी भूषण स्वामी यांचे प्रवचन झाले. त्यांच्या हस्ते मुहूर्तमेढ रोवण्यात आली.

यावेळी अन्नपूर्णा पूजन, पोती पूजन करण्यात आले. समर्थ सेवा मंडळाचे अभ्यंकरबुवा रामदासी, अभिराम स्वामी, उस्मानाबादचे मठपती रामचंद्र तडवळे, पांगरी मराठवाडा मठपती पांडुरंग बुवा, मंदारबुवा रामदासी, मीनाताई भावे, कमलाताई जबलपूर, रसिका ताम्हणकर यांच्यासह समर्थ संप्रदायाचे महंत, मठपती, मानकरी उपस्थित होते.

सकाळी साडेअकरा वाजता समाधी मंदिर ते पेठेतील मारुती मंदिर असा छबिना काढण्यात आला. यावेळी हलगीच्या गजरात  रामा रामा हो रामा रामदास गुरू माझे आई, मजला ठाव द्यावा पायी, अशा भजनाच्या नामघोषात शिंग, तुतारीच्या गजरात छबिना काढण्यात आला. त्यानंतर समाधी मंदिरात आरत्याच्या जयघोषात १३ प्रदक्षिणा घालण्यात आल्या.

समर्थ सेवा मंडळाच्या वतीने श्रीधर कुटी येथे पहाटे काकड आरती, समर्थ पादुका षोडशोपचार पाद्यपूजा करण्यात आली. यावेळी नितीन जोशी रामदासी यांनी दासबोध वाचन केले. त्यानंतर पुण्याचे डॉ. अजित कुलकर्णी यांचे प्रवचन, मकरंदबुवा रामदासी यांचे कीर्तन तर मृणाल नाटेकर, अभिजित अपस्तंभ (नांदेड) यांचा संगीताचा कार्यक्रम झाला. त्यांना सागर पटोकार आणि अभिजित सिनरकर यांनी साथ दिली.भक्तांसाठी सोय...सज्जनगडावर दोन्ही संस्थांच्या वतीने येणाऱ्या समर्थ भक्तांसाठी निवास, महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे. येणाऱ्या भाविकांना सहकार्य करण्यासाठी परळी ग्रामपंचायतीच्या वतीने कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTempleमंदिर