सातारा पोलिसांनी आणखी दोन कार्यकर्त्यांना उचलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 14:22 IST2017-10-09T14:19:00+5:302017-10-09T14:22:36+5:30

सुरुचि धुमश्चक्रीप्रकरणी पोलिसांनी सोमवारी आणखी दोघांना उचलले आहे. दुपारपर्यंत दोघांनाही अटक करण्यात आली नव्हती. त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. हे दोघेही खासदार उदयनराजे भोसले यांच्या गटाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांना गोळीबारातील दोन पुंगळ्या सापडल्या असून, त्या जप्त करण्यात आल्या आहेत.

Satara police picked up two more workers | सातारा पोलिसांनी आणखी दोन कार्यकर्त्यांना उचलले

सातारा पोलिसांनी आणखी दोन कार्यकर्त्यांना उचलले

ठळक मुद्देसुरुचि धुमश्चक्रीप्रकरणी चौकशी सुरू पकडण्याची मोहीम वेगाने; दोन पुंगळ्या जप्तदोघेही खासदार उदयनराजे भोसले यांच्या गटाचे आतापर्यंत सातजणांना अटक

सातारा : सुरुचि धुमश्चक्रीप्रकरणी पोलिसांनी सोमवारी आणखी दोघांना उचलले आहे. दुपारपर्यंत दोघांनाही अटक करण्यात आली नव्हती. त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. हे दोघेही खासदार उदयनराजे भोसले यांच्या गटाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांना गोळीबारातील दोन पुंगळ्या सापडल्या असून, त्या जप्त करण्यात आल्या आहेत.


येथील सुरुचि बंगल्यावर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन राजे गटांत जोरदार धुमश्चक्री उडाली होती. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दोन्ही गटांच्याविरोधात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना उचलण्यास सुरुवात केली आहे.

आतापर्यंत सातजणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाच्या चार कार्यकर्त्यांचा समावेश आहे. तर खासदार उदयनराजे भोसले यांच्या गटाच्याही तीन कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. तर सोमवारी आणखी दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दुपारपर्यंत त्यांच्याकडे चौकशी सुरू होती.

Web Title: Satara police picked up two more workers