शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

वाहन चोर आंतरराज्य टोळी जेरबंद, सव्वा कोटींची १८ वाहने जप्त; सातारा पोलिसांची दबंग कारवाई

By नितीन काळेल | Updated: May 5, 2023 13:44 IST

या कारवाईमुळे आंतरराज्य वाहन चोरी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला

सातारा : सातारा जिल्हा पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने दबंग कारवाई करत वाहन चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला जेरबंद केले. तसेच दुचाकी चोरट्यांच्याही मुसक्या आवळल्या. या दोन्ही कारवाईत चारचाकी १० तर ८ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. या वाहनांची किंमत सुमारे सवा कोटी रुपये आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलिस अधीक्षक समीर शेख आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर यांनी जिल्ह्यातील वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याची सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना केली होती. या अनुषंगाने देवकर यांनी सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र भोरे आणि उपनिरीक्षक अमित पाटील व विश्वास शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली तीन पथके तयार केली. दरम्यान, दि. ३० एप्रिल रोजी पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना बातमीदारामार्फत पोलिस रेकाॅर्डवरील अजिम सलीम पठाण (वय ३८, रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव) याने परराज्यातून चाेरीतील चारचाकी वाहने आणून ती साताऱ्यासह रायगड आणि सोलापूर जिल्ह्यात विक्री केल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी अजिम पठाणला ताब्यात घेण्याची सूचना केली.पोलिसांच्या या पथकाने अजिम पठाण आणि कोल्हापूर येथील एकाच्या ठावठिकाणाबाबत गोपनीय माहिती प्राप्त केली. तसेच रहिमतपूरहून पठाणला ताब्यात घेतले. त्यानंतर सातारा शहरातील शाहूपुरी पोलिस ठाण्यातील एका गुन्ह्यात अटक केली. चौकशी दरम्यान त्याने परराज्यातून चोरीची ७ वाहने आणून सातारा, रायगड जिल्ह्यात विक्री केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोंद चाेरीतील कार तसेच दिल्ली व उत्तरप्रदेश राज्यात चोरी केलेल्या अशी एकूण १० चारचाकी वाहने जप्त केली. या गाड्यांची किंमत १ कोटी १५ लाख रुपये इतकी आहे. या कारवाईमुळे आंतरराज्य वाहन चोरी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला.दरम्यान, दि. २ मे रोजी पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना पोलिस रेकाॅर्डवरीलच महेश रामचंद्र अवघडे व त्याच्या दोन साथीदारांनी भुईंज पोलिस ठाणे हद्दीत एकास मारहाण करुन त्यांची दुचाकी व खिशातील १८३० रुपये जबरदस्तीने चोरुन नेले होते. त्याबाबत भुईंज ठाण्यात गुन्हा नोंद होता. याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत महेश अवघडे व त्याच्या साथीदाराकडून विविध ठिकाणाहून चोरलेल्या ८ दुचाकी जप्त केल्या. या दुचाकींची किंमत ३ लाख २० हजार रुपये आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस