साताऱ्याच्या खेळाडूंना हवे इंनडोअर स्टेडियम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 12:58 AM2019-07-28T00:58:48+5:302019-07-28T00:59:32+5:30

साता-यात कोणत्या खेळांना वाव आहे, स्पर्धा सुरू असताना कोणत्या अडचणी येतात, खेळाडूंसाठी कोणते साहित्य उपलब्ध आहेत, या संदर्भात जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांच्याशी ‘लोकमने’ने साधलेला सवांद..

 Satara players want indoor stadiums | साताऱ्याच्या खेळाडूंना हवे इंनडोअर स्टेडियम

साताऱ्याच्या खेळाडूंना हवे इंनडोअर स्टेडियम

googlenewsNext
ठळक मुद्देकबड्डी, कुस्ती, खो-खो या स्पर्धांना वाव

योगेश घोडके ।

सध्या पावसाळा सुरू आहे. या काळात शालेय स्पर्धांचे आयोजन केले जाते. सध्या जिल्ह्यात क ोणकोणत्या स्पर्धा सुरू आहेत, साताºयात कोणत्या खेळांना वाव आहे, स्पर्धा सुरू असताना कोणत्या अडचणी येतात, खेळाडूंसाठी कोणते साहित्य उपलब्ध आहेत, या संदर्भात जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांच्याशी ‘लोकमने’ने साधलेला सवांद..
प्रश्न : पावसाळ्यात स्पर्धा सुरू असताना कोणत्या अडचणी येतात?
उत्तर : शालेय स्पर्धा या पावसाळ्यात असतात. महाबळेश्वर, पाटण, जावळी याठिकाणी स्पर्धा आयोजित करताना समस्या जाणवतात. त्यामुळे साताºयामध्ये अत्याधुनिक अशा इंनडोअर स्टेडियमची गरज आहे.
प्रश्न : जिल्ह्यात कुठल्या खेळाला वाव आहे?
उत्तर : कबड्डी, खो-खो, कुस्ती, बॉक्सिंग, मल्लखांब अशा खेळांना वाव आहे. तसेच गेल्या वर्षी साताºयाचे ११९ खेळाडू राष्ट्रीयस्तरावर चमकले आहेत. साताºयाला राष्ट्रीयस्तरावराचा द्वितीय क्रमांक मिळाला आहे.
प्रश्न : सध्या जिल्ह्यात कोणकोणत्या स्पर्धा सुरू आहेत.?
उत्तर : सध्या सुब्रतोरॉय फुटबॉल स्पर्धा सुुरू आहे. तसेच प्रत्येक तालुका क्रीडा विभागाबरोबर बैठक घेऊन पुढील स्पर्धेचे नियोजन लावण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत नऊ तालुक्यांच्या बैठका पूर्ण झाल्या आहेत. अजून तीन तालुक्यांतील बैठका दोन दिवसांत पूर्ण करणार आहे.
प्रश्न : खेळाडूंच्या साहित्यांची काय अवस्था आहे?
उत्तर : जिल्ह्यात क्रीडा संकुल व तालुका संकुलामध्ये सर्व सुविधा आहेत. तसेच ज्या ठिकाणी मैदाने नाहीत, त्याठिकाणी शासनाच्या निधीतून मैदाने अद्ययावत करत आहे. तसेच बॅडमिंटनचा हॉलही अद्ययावत करत आहे. त्यामुळे ग्रामीण, शहरी खेळाडूंना याचा फायदा होत आहे. त्या माध्यमातून ग्रामीण भागातील खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळण्यास मदत होत आहे.

सरावासाठी पुण्याला रवाना
जिल्ह्यातील प्रत्येक तालुका त्याच्या-त्याच्या खेळाने ओळखला जातो. ग्रामीण भागातील खेळाडू अतिशय चपळ असतात. त्यांना त्या पद्धतीने सराव करता येत नाही. त्यामुळे ते पुणे, मुंबई या शहराकंडे वळत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीच्या सुविधा जिल्ह्यात राबवल्या तर बाहेर जाणारा खेळाडू जिल्ह्यातच थांबेल व जिल्ह्याचे नाव होईल.

यांनी गाजवले साताºयाचे नाव
सातारा जिल्हा पहिल्यापासून कुस्ती, खो-खो, कबड्डी, मल्लखांब, धावणे अशा खेळांने ओळखला जातो. कुस्तीमधून खाशाबा जाधव यांनी आॅलिंपिक स्पर्धेत यश मिळविले. धावणे स्पर्धेत माणची कन्या ललिता बाबर हिने २०१४ मध्ये झालेल्या आॅलिंपिक स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेत ललिता बाबरने दहावा क्रमांक मिळविला होता. तेंव्हाही जिल्ह्याचे नाव मोठे झाले होते. त्यांचा इतर खेळाडूही आदर्श घेत आहेत.

 

जिल्ह्यात खेळाडूंची संख्या जास्त आहे. हे खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत. साताºयाचे काही खेळाडू आॅलिम्पिक स्पर्धेत चमकले आहेत.
- युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी, सातारा


 

Web Title:  Satara players want indoor stadiums

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.