शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

सातारा : कचरा रस्त्यावर टाकणाऱ्यास हजारचा दंड, कऱ्हाड पालिकेकडून कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 3:08 PM

परदेशात उघड्यावर कचरा टाकल्यास तसेच साधे धूम्रपान केल्यास त्यास लगेच दंडाला सामोरे जावे लागते, हे ऐकले असेल. मात्र, हाच नियम आता कऱ्हाड पालिकेने शहरात लागू केलाय. पटत नाही ना, हे खरं आहे. ही कारवाई खूप दिवसांपासून केली जात आहे.

ठळक मुद्दे कचरा रस्त्यावर टाकणाऱ्यास हजारचा दंड, कऱ्हाड पालिकेकडून कारवाई  स्वच्छ शहरसाठी थेट अंमलबजावणी; दिसताक्षणीच हातात शास्तीची पावती

कऱ्हाड : परदेशात उघड्यावर कचरा टाकल्यास तसेच साधे धूम्रपान केल्यास त्यास लगेच दंडाला सामोरे जावे लागते, हे ऐकले असेल. मात्र, हाच नियम आता कऱ्हाड पालिकेने शहरात लागू केलाय. पटत नाही ना, हे खरं आहे. ही कारवाई खूप दिवसांपासून केली जात आहे.

नुकत्याच मे महिन्यात उघड्यावर कचरा टाकल्याप्रकरणी तीनजणांना कारवाईला सामोरं जावं लागलंय. तर बुधवारी कोल्हापूर नाक्यावर चौघा व्यापाऱ्यांनी कचरा टाकल्याप्रकरणी चारशे रुपये दंडही भरला. त्यामुळे यापुढे आता उघड्यावर कचरा टाकताना आढळणाऱ्यास थेट शंभर तसेच हजार रुपये दंड म्हणून भरावा लागणार आहे.असा केला जाऊ शकतो दंडपालिकेच्या कचराकुंड्याव्यतरिक्त उघड्यावर कचरा टाकताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र नगरपंचायती, नगरपरिषद आणि औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ कलम २३१ नुसार कारवाई केली जाऊ शकते. कचरा टाकण्यात आलेल्या व्यक्तीवर कारवाई करीत त्याच्याकडून एक हजार रुपये दंडाची रक्कम आकारण्यात येईल, अशी तरतूद या कलमामध्ये करण्यात आलेली आहे.कारवाईसाठीचे पथकशहरात पालिकेतील प्रभागांसह वाढीव हद्दीत व सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर व नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर तसेच उघड्यावर शौचालयास बसणाऱ्यांवर थेट कारवाई केली जाणार आहे. यासाठी पालिकेतील एकूण नऊ मुकादम आणि त्यांच्याअंतर्गत अठरा कर्मचारी असे पथक यापूर्वीच तयार करण्यात आले आहे. या पथकाचे प्रमुख रफिक भालदार, मिलिंद शिंदे, देवानंद जगताप, मारुती काटरे, रोहित आतवाडकर, शेखर लाड हे असून, यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांकडून थेट कारवाई केली जात आहे. 

 

कऱ्हाड शहरात कोठेही कचरा पडू नये म्हणून पालिकेकडून घरोघरी डस्टबीन वाटप करण्यात आले आहेत. तसेच व्यापाऱ्यांचा कचरा हा दरारोज पालिकेच्या ट्रॅक्टरमधून सकाळी व रात्री गोळा केला जातोय. तरीही उघड्यावर कोणी कचरा टाकताना आढळ्यास व्यावसायिक तसेच नागरिकांवर थेट कारवाई केली जात आहे.-देवानंद जगतापप्रभारी स्वच्छता निरीक्षक, आरोग्य विभागकऱ्हाड पालिका

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानSatara areaसातारा परिसर