शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : सहा वाहनांच्या विचित्र अपघातात एक ठार; एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 18:20 IST

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कऱ्हाड तालुक्यातील इंदोली फाटा येथे गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सहा वाहनांचा विचित्र अपघात झाला. यामध्ये एक वृद्ध ठार झाला असून, एकजण जखमी आहे.

ठळक मुद्देसहा वाहनांच्या विचित्र अपघातात एक ठार; एक जखमीगॅस वाहतूक करणाऱ्या टँकरला डंपरची धडक

उंब्रज (सातारा) : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कऱ्हाड तालुक्यातील इंदोली फाटा येथे गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सहा वाहनांचा विचित्र अपघात झाला. यामध्ये एक वृद्ध ठार झाला असून, एकजण जखमी आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, उंब्रज परिसरात गुरुवारी दुपारी पाऊस पडत होता. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याकडून कोल्हापूरकडे जाण्याच्या लेनवर गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरला डंपरची धडक बसली. या धडकेनंतर गॅसची गळती सुरू झाली.

यावेळी चालकाने तातडीने वरिष्ठाशी संपर्क साधून तात्पुरती गळती बंद केली. याच दरम्यान दुसरा एक टँकर तेथून निघाला होता. त्याही वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने टँकर महामार्गावर फिरला. या टँकरने दोन कार व एका पिकअप जीपला धडक दिली.यामध्ये पिकअप जीप पलटी झाली. जीपमधील एक वृद्ध जागीच ठार झाला असून, एकजण जखमी झाला. जखमीला तातडीने कऱ्हाड येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. अनुचित प्रकार घडू नये म्हणून उंब्रज पोलिसांनी कऱ्हाड येथून अग्निशमन दलाचा बंब बोलावून घेतला.अपघातानंतर टँकर मार्गस्थदरम्यान, अपघातानंतर गळती झालेला टँकर चालक घटनास्थळावरून घेऊन गेला. सुरक्षिततेच्या कारणाने पोलिसांनी हा टँकर ताथवडे टोलनाक्याच्या पुढे अडविला असून, तो रस्त्याच्या कडेला उभा केला.

त्या ठिकाणी अग्निशमन बंब पाठविला आहे. ही गळती थांबल्याची खात्री झाल्यानंतर टँकर पुढे जाऊ दिला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात