राष्ट्रीय महामार्गावर पाच वाहनांचा विचित्र अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 02:43 PM2018-04-26T14:43:59+5:302018-04-27T01:39:02+5:30

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर मलकापुर - नांदुरा दरम्यान काटी फाट्याजवळ एसटी बस, इनोव्हा कार, रेतीचे टिप्पर, हुंदाई क्रेटा कार व ट्रक अशा 5 वाहनांचा एकाच ठिकाणी विचित्र अपघात झाला.

 Five vehicles on the national highway have a strange accident | राष्ट्रीय महामार्गावर पाच वाहनांचा विचित्र अपघात

राष्ट्रीय महामार्गावर पाच वाहनांचा विचित्र अपघात

Next

नांदुरा : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर मलकापुर - नांदुरा दरम्यान काटी फाट्याजवळ एसटी बस, इनोव्हा कार, रेतीचे टिप्पर, हुंदाई क्रेटा कार व ट्रक अशा 5 वाहनांचा एकाच ठिकाणी विचित्र अपघात झाला. ही घटना गुरुवारी सकाळी 10.30 वाजेदरम्यान घडली. बसमधील 69 प्रवाशांसह दोन्ही कारमधील प्रवाशी सुरक्षित आहेत.

दारव्हा आगाराची जळगाव यवतमाळ बस प्रवासी घेऊन मलकापूरवरून नांदुराकडे जात असतांना काटी फाट्याजवळ समोर ट्रॅफिक जाम असल्याने बस चालकाने बस थांबवली. त्यामागे असणारी जळगाव खान्देश येथील इनोव्हासुद्धा थांबली. कार मागील मलकापूर येथील वडनेरकडे जाणारे रेतीचे टिप्पर हे देखील वाहतूक खोळंबल्याने थांबले. त्यापाठोपाठ शिरपूर-धुळे येथील हुंदाई क्रेटा कार चालकाने समोर वाहतूक थांबली असल्याने आपल्या कारचा वेग कमी करत कार थांबवली. मात्र त्या मागून येणा-या ट्रकनं क्रेटा कारला जोरदार धडक दिली. त्यामुळे समोरील सर्व वाहने एकमेकांवर आदळली. यावेळी कारमधील प्रवासी व बसमधील प्रवासी या अचानक घटनेने पुरते घाबरले होते.

या अपघातात इनोव्हा कारसह हुंदाई क्रेटा कारचा अक्षरशा चुराडा झाला. काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले. बसमधील प्रवाशांना इतर बसेसमध्ये बसवून रवाना करण्यात आले असून, घटनास्थळी मलकापूर ग्रामीण पोस्टेचे बावने,पवार, कुलकर्णी पोहोचले असून, वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

Web Title:  Five vehicles on the national highway have a strange accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात