शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सातारा पालिकेने न झालेल्या कामांची बिले काढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:10 IST

नगर पालिकेच्या वतीने शहरात स्वच्छता अभियानांतर्गत अनेक कामे करण्यात आली. यामध्ये न झालेल्या कामांची बिले ही पालिकेकडून अदा करण्यात आल्याचा आरोप भाजप नगरसेवक विजय काटवटे यांनी केला. दरम्यान,

ठळक मुद्देभाजप नगरसेवकाचा आरोप : सत्ताधारी आक्रमकपुरावा नसताना बेछूट वक्तव्य न करण्याचा सल्ला

सातारा : नगर पालिकेच्या वतीने शहरात स्वच्छता अभियानांतर्गत अनेक कामे करण्यात आली. यामध्ये न झालेल्या कामांची बिले ही पालिकेकडून अदा करण्यात आल्याचा आरोप भाजप नगरसेवक विजय काटवटे यांनी केला. दरम्यान, कोणताही पुरावा नसताना बेछूट आरोप करू नये, असे सांगत सत्ताधाऱ्यांनी काटवटे यांना धारेवर धरले. यानंतर मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी स्वच्छता अभियानाची कोणतीही बिले अद्याप काढली नसल्याचा खुलासा यावेळी केला.

सातारा पालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी पालिकेच्या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, मुख्याधिकारी शंकर गोरे, बांधकाम सभापती मनोज शेंडे, आरोग्य सभापती यशोधन नारकर, पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, नगरसेवक दत्ता बनकर यांच्यासह सर्व सभापती, नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.

सभेला सुरुवात होताच विरोधकांनी अजेंड्यावरील वृक्षगणनेचा मुुद्दा लावून धरला. वृक्षगणना करणे बंधणकारक असताना पालिकेकडून अद्याप वृक्षगणना का करण्यात आली नाही, वृक्षगणना नक्की कोण करतेय, संबंधित अधिकाºयाचे नाव जाहीर करावे, असे अनेक प्रश्न विरोधकांनी उपस्थित केले. वृक्षगणनेचे काम ठेकेदराला नव्हे तर आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांकडून करावे, अशी मागणी नगरसेवक विजय काटवटे यांनी केली. सुमारे अर्धा तास या विषयावर चर्चा झाली.

यानंतर सभेत २०१८-१९ या वर्षासाठी स्वच्छता अभियान व त्या अंतर्गत करावयाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. या विषयाला नगरसेवक विजय काटवटे यांनी उपसूचना मांडली. यामध्ये त्यांनी पालिकेने स्वच्छता अभियानात न केलेल्या कामांची बिले काढण्यात आली, असा आरोप केला. या आरोपाचे सत्ताधारी नगरसेवकांनी खंडन केले.

कोणताही पुुरावा नसताना असे बेछूट आरोप करून सभागृहाचा वेळ घालवू नये, असा सल्ला दिला. नगराध्यक्षा माधवी कदम यांनीही आरोप करताना तो पुराव्यानिशी करावा, असे सांगितले. यावर विजय काटवटे यांनी माहिती अधिकाराखाली मागविण्यात आलेली माहिती प्राप्त झाल्यानंतर सत्य समोर येईल, असे सांगून या विषयावर पडदा टाकला. दरम्यान, घंटागाडीवर घंटा न वाजवता स्वच्छता सर्वेक्षणासाठी तयार करण्यात आलेली ध्वनीफीत प्रत्येक घंटागाडीला बंधनकारक करावी, जेणेकरून नागरिकांमध्ये स्वच्छेबाबत जनजागृती होईल, अशी मागणी विजय काटवटे यांनी केली. नगरसेवक धनंजय जांभळे यांनी या मागणीला अनुमोदन दिले.

मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी स्वच्छ सर्वेक्षण अभियान व त्याच्या निकषाची माहिती दिली. तसेच पालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छ वार्ड’ स्पर्धेचा निकाल लवकरच जाहीर केला जाईल, अशी ग्वाही देखील दिली. यावेळी नगरपरिषद हद्दीतील वृक्षांची गणना करणे, स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत राबविण्यात येणाºया कामांंच्या खर्चास मंजुरी देणे, आस्थापनावरील कायम कर्मचाºयांना सानुग्रह अनुदान देणे, सदर बझार येथील करिअप्पा चौकातील बागेचे ‘श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज उद्यान’ असे नामकरण करणे व पालिकेच्या तीन स्टार नामांकनासह एकूण १६ विषयांना सभेत मंजुरी देण्यात आली...तर नोकरी सोडेन : मुख्याधिकारीस्वच्छतेच्या ठेक्यात मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या बंधूचा सहभाग असल्याचा आरोप सभेत भाजप नगरसेवक विजय काटवटे यांनी केला. मुख्याधिकारी गोरे यांनी हे आरोप खोटे असल्याचे सांगत त्रिस्तरीय समितीद्वारे याची चौकशी करण्यात यावी, आरोप सिद्ध झाल्यास मी नोकरी सोडेन, अशी स्पष्टोक्ती दिली. या विषयावरून सत्ताधारी देखील आक्रमक झाले. अखेर काटवटे यांनी लेखी पत्र देऊन आरोप मागे घेतला.घंटागाडीची ठेका पद्धत रद्द करा : मोनेपालिकेच्या वतीने स्वच्छतेचा ठेका खासगी कंपनीला दिला जातो. मात्र, या कंपनीकडून स्वच्छतेचे चांगले काम केले जात नाही. नागरिकांच्या सतत तक्रारी प्राप्त होत आहे. त्यामुळे खासगी ठेकेदार पोसण्याऐवजी पालिकेने जुन्या घंडागाड्या सुरू कराव्यात, त्यामुळे स्थानिकांना पुन्हा रोजगार प्राप्त होईल, अशी मागणी नगरसेवक अशोक मोने यांनी केली. यावर योग्य निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही सत्ताधारी आघाडीच्या वतीने देण्यात आली.शहीद कर्नल संतोष महाडिकयांचे स्मारक उभारणारपालिकेच्या मालकीच्या जागेत शहीद कर्नल संतोष महाडिक यांचे स्मारक उभारण्याचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला. जवान संतोष महाडिक यांचे स्मारक उभारणारी सातारा पालिका ही महाराष्ट्रातील पहिलीच पालिका ठरणार आहे. हे स्मारक नागरिकांना प्रेरणादायी ठरावे, यासाठी योग्य जागेची निवड करावी, अशी मागणी यावेळी विरोधक व सत्ताधाºयांनी केली. 

सानुग्रह अनुदान मंजूरआस्थापनावरील कायम कर्मचाºयांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत पालिकेत एकमत झाले. ४५८ पैकी ४५० कर्मचारी यासाठी पात्र असून, संबंधित कर्मचाºयांना १० हजार रुपये अ‍ॅडव्हान्स व १२ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आल्याची घोषणा नगराध्यक्षांनी केली.

सातारा पालिका सर्वसाधारण सभा

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSatara areaसातारा परिसरBJPभाजपा