शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

सातारकरांनो काटकसरीने करा पाण्याचा वापर, ‘कास’च्या पाणीपुरवठ्यात आजपासून कपात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 16:11 IST

सातारा : उन्हाळ्यात निर्माण होणारी संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी सातारा पालिकेने कास योजनेच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवार, ...

सातारा : उन्हाळ्यात निर्माण होणारी संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी सातारा पालिकेने कास योजनेच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवार, दि. ७ मे पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असून, कास योजनेवरील संबंधित पेठांचा पाणीपुरवठा आठवड्यातून एक दिवस बंद ठेवला जाणार आहे.सातारा शहराला कास व शहापूर योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पालिकेकडून कास धरणाची उंची वाढविण्यात आल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात पाचपट वाढ झाली आहे. तरीदेखील प्रशासनाकडून ऐन उन्हाळ्यात पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आल्याने याची नागरिकांना झळ सहन करावी लागणार आहे.

पाणीपुरवठा विभागाकडून पाणीकपातीचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्यानुसार संबंधित पेठांचा पाणीपुरवठा आठवड्यातून एक दिवस बंद ठेवला जाणार आहे. या निर्णयामुळे नागरिकांना पावसाळा सुरू होईपर्यंत पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे.

असे आहे कपातीचे वेळापत्रक

  • सोमवार : शुक्रवार पेठ, गडकर आळी
  • मंगळवार : बोगदा परिसर, पावर हाऊस, व्यंकटपुरा पेठ, धननीची बाग, करंडबीनाका, पोळ वस्ती, पावर हाऊस झोपडपट्टी, चिमणपुरा पेठ.
  • बुधवार : मनामती चौक, गुजर आळी, चिमणपुरा, ढोणे कॉलनी.
  • गुरुवार : भटजी महाराज मठ परिसर, रामाचा गोट, गवंडी आळी, मंगळवार तळे, कोल्हटकर आळी, नागाचा पार, पद्मावती मंदिर परिसर, होलार समाज मंदिर परिसर, मंगळवार पेठ, ठक्कर कॉलनी, बोगदा ते समर्थ मंदिर, धस कॉलनी, दस्तगीरनगर.
  • शुक्रवार : संत कबीर सोसायटी व पोळ वस्ती, पापाभाई पत्रेवाला चाळ, चिमणपुरा पेठ, गारेचा गणपती, मनामती चौक, नागाचा पार.
  • शनिवार : शुक्रवार पेठ, प्रतापगंज पेठ, बुधवार नाका, नामदेव वाडी.
  • रविवार : आदालत वाडा परिसर, माची पेठ, बोगदा ते बालाजी अपार्टमेंट परिसर, कांबळे वस्ती, जांभळे वाडा परिसर, बोगदा परिसर, जंगी वाडा, गोल मारुती, गोल मारुती ते राजवाडा लाईन. 
टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी