सातारा पालिकेच्या पाणीपुरवठा सभापतींना शिवीगाळ, दमदाटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 13:38 IST2019-05-30T13:35:40+5:302019-05-30T13:38:47+5:30
सातारा : नळकनेक्शनला जोडलेली मोटर काढण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ करण्यात आली. दरम्यान, ...

सातारा पालिकेच्या पाणीपुरवठा सभापतींना शिवीगाळ, दमदाटी
सातारा : नळकनेक्शनला जोडलेली मोटर काढण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ करण्यात आली. दरम्यान, शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आनंदराव सोनकर (भूतेबोळ, शनिवार पेठ) याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाण्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी नळाला मोटारी लावणाऱ्यांवर कारवाई करण्याचा बडगा पाणीपुरवठा विभागाने उगारला आहे. गुरुवारी सकाळी नगराध्यक्षा माधवी कदम, सभापती श्रीकांत आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा विभागाच्या पथकाने शहरात ठिकठिकाणी धडक मोहीम राबवली. पाण्याचा दुरुपयोग करणाऱ्या नागरिकांना जागेवरच कारवाईची नोटीस बजावण्यात आली.
दरम्यान, शनिवार पेठेतील भूतेबोळ येथे राहणाºया आनंदराव सोनकर यांनी नळकनेक्शनला मोटार लावल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. ही मोटार तत्काळ काढून टाका अन्यथा जप्त केली जाईल, असा इशारा सभापती आंबेकर यांनी दिला. या प्रकारानंतर सोनकर यांनी चिडून जाऊन आंबेकर यांना शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच त्यांच्या अंंगावर धावून आल्याचे फिर्यादित नमूद केले आहे. आंबेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आनंदराव सोनकर याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.