शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा-कास मार्गावर पिसाणी फाटा येथे मिनीबसचा अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 14:19 IST

Accident Sataranews- सातारा -कास मार्गावर पिसाणी फाटा ता. सातारा येथे आज सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी पर्यटनास निघालेल्या मिनीबसचा अपघात होऊन चार जण किरकोळ जखमी झाले .दरम्यान तात्काळ पिसाणी गावचे सरपंच व ग्रामस्थ घटनास्थळी दाखल होऊन अपघातातील जखमींना गाडीतुन बाहेर काढण्यास सहकार्य करून तात्काळ त्यांना उपचारासाठी सातारा येथे रूग्णवाहिकेतुन पाठविण्यात आले.

ठळक मुद्देसातारा-कास मार्गावर पिसाणी फाटा येथे मिनीबसचा अपघातइस्लामपूरमधील चार जण किरकोळ जखमी !

पेट्री/सातारा : सातारा -कास मार्गावर पिसाणी फाटा ता. सातारा येथे आज सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी पर्यटनास निघालेल्या मिनीबसचा अपघात होऊन चार जण किरकोळ जखमी झाले .दरम्यान तात्काळ पिसाणी गावचे सरपंच व ग्रामस्थ घटनास्थळी दाखल होऊन अपघातातील जखमींना गाडीतुन बाहेर काढण्यास सहकार्य करून तात्काळ त्यांना उपचारासाठी सातारा येथे रूग्णवाहिकेतुन पाठविण्यात आले.सलग तीन दिवस सुट्ट्या असल्यामुळे कास तसेच बामणोलीला  फिरण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडाली आहे. इस्लामपूरहून युवकांचा एक ग्रुप टेम्पो ट्रॅव्हलरने वासोटा येथे फिरण्यासाठी निघाला होता. कास रस्त्यावरील पिसाणी या गावाजवळ आल्यानंतर चालकाचे एका वळणावर नियंत्रण सुटले. ग्रामस्थांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार सातारा शहराच्याच्या पश्चिमेस सातारा - कास मार्गावर पिसाणी फाटा येथील मोरी जवळच्या वळणावर आज सकाळी ६ वा.२० मिनिटांनी (एम. एच. १२ एफ सी ३५१६) मिनीबस उलटली.

 वाहनात हवा कमी असल्याने व नियत्रंण सुटल्याने अपघात झाल्याचे वाहनचालकाने ग्रामस्थांना सांगितले. या बसमधील इस्लामपुर येथील वैदयकीय महाविद्यालयाचे विदयार्थी असल्याची माहिती मिळाली. दरम्यान अपघातात चार जण किरकोळ जखमी झाले असुन जखमींना बाहेर काढण्यास पिसाणी ग्रामस्थांनी सहकार्य करून त्यांना तात्काळ सातारा येथे रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका बोलवल्याची माहिती पिसाणीचे सरपंच लक्ष्मण गोगावले यांनी माहिती दिली.

हा अपघात झाल्याचे समजताच सातारा तालुका पोलीस आणि शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना एका खासगी वाहनाने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. काहींच्या गुडग्याला तर काहींच्या हाताला खरचटले होते. प्राथमिक उपचार केल्यानंतर मुले रुग्णालयातून निघून गेली. सातारा तालुका पोलीस ठाण्यात या अपघाताची अद्याप नोंद झाली नव्हती.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसरKas Patharकास पठारhighwayमहामार्ग