शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
4
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
5
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
6
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
7
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
8
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
9
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
10
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
11
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
12
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
13
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
14
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
15
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
16
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
17
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
18
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
19
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
20
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान

सातारा : अनेक दुष्काळी गावं बनली श्रीमंत, कोट्यवधी रुपयांची उन्हाळी पिकं हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 13:54 IST

वॉटर कप स्पर्धा दुष्काळी तालुक्यांना वरदान ठरली असून आता पडलेल्या पावसामुळे माण तालुक्यातील माळरानं आबादानी झाली आहेत. शेततलाव, पाझर तलाव, डीपसीसीटी, नालाबांधात पाणीसाठा झाला असून विहिरींच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. तर भांडवलीत पाण्याचे मोठे भांडवल झाले आहे.

ठळक मुद्देअनेक दुष्काळी गावं बनली श्रीमंतकोट्यवधी रुपयांची उन्हाळी पिकं हाती४५ दिवसांच्या श्रमदानामुळे पालटलं रुपडं

नितीन काळेलसातारा : वॉटर कप स्पर्धा दुष्काळी तालुक्यांना वरदान ठरली असून आता पडलेल्या पावसामुळे माण तालुक्यातील माळरानं आबादानी झाली आहेत. शेततलाव, पाझर तलाव, डीपसीसीटी, नालाबांधात पाणीसाठा झाला असून विहिरींच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. तर भांडवलीत पाण्याचे मोठे भांडवल झाले आहे. दुसरीकडे उपलब्ध पाण्यामुळे नगदी उन्हाळी पिके घेतल्याने दुष्काळी भागातील अनेक शेतकरी खऱ्या अर्थाने श्रीमंत झाले आहेत. ४५ दिवसांचं श्रमदान गावांना पाणीदार करुन गेले आहे.राज्यात गेल्या तीन वर्षांपासून अभिनेता अमिर खानच्या पाणी फौंडेशनच्या माध्यमातून वॉटर कप स्पर्धा सुरु झाली आहे. या स्पर्धेचे दृश्य परिणाम सध्या दिसू लागले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यावर्षी माण तालुक्यातील ६६ गावे स्पर्धेत उतरली होती.

या सर्व गावात जलसंधारणाचे मोठे काम झाले आहे. तर काही गावांनी उद्दिष्टापेक्षा अधिक काम केले आहे. याचा दृश्य परिणाम म्हणजे पाणीसाठा वाढला आहे. यावर्षी मान्सूनने वेळेत हजेरी लावली. माण तालुक्याच्या काही भागात हा पाऊस चांगला झाला. त्यामुळे भांडवली, थदाळे, किरकसाल, श्री पालवन, अनभुलेवाडी, पिंगळी खुर्द भागात पाणी साठले. पाझर तलाव, नालाबांध भरले. तर माळरानावरील सीसीटी, डीपसीसीटी भरल्याने परिसर आबादानी झाला.

बनगरवाडीसारख्या गावातील शेततलाव, नालाबांध भरल्याने ओढ्याला पाणी वाहू लागले. परिणामी विहिरींची पातळी वाढल्याने पिकांना शाश्वत पाणी मिळू लागलं आहे. तसेच उन्हाळ्यातही पिकांना पाणी मिळणार आहे.

वॉटर कपच्या गावांत टँकरला टाटा...उन्हाळ्यात माण तालुक्यातील अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागायचा. त्यासाठी गावोगावी टँकरची भिरकीट सुरू असायची. लोकांबरोबरच जनावरांचीही तहान टँकरवर अवलंबून असायची. कधीकधी तर दोन-तीन दिवस टँकर यायचा नाही. त्यामुळे लोकांना पाणी कमी प्रमाणात वापरावे लागायचे. पण, वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांनी यावर्षीपासून टँकरला टाटा केला आहे.

गेल्यावर्षी स्पर्धेंतर्गत जलसंधारणाची कामे झाल्याने पावसाळ्यात पाणीसाठा झाला होता. त्यामुळे कारखेल, थदाळे, बिदाल, किरकसाल, पिंगळी खुर्द, काळेवाडी, जाशी, दिवडी आदी गावांत यावर्षी उन्हाळ्यात टँकरही फिरकला नाही. या गावांनी पाणीसाठा केल्याने हे चित्र यंदा प्रथमच दिसले.कांदा, वाटाणा, डाळिंब, कलिंगडातून ५० कोटीपर्यंत उड्डाण !जलसंधारणामुळे उन्हाळ्यातही पाणी उपलब्ध झाले आहे. या पाण्यावर कांदा, वाटाणा, कलिंगड, ऊस, पालेभाज्या, डाळिंब आदी घेण्यात येत आहे. त्यामुळे बिदाल, थदाळे, कारखेल, किरकसाल, परकंदी आदी गावांतून सुमारे ५० कोटीपर्यंत शेती उत्पादन निघाले आहे.

बिदालमध्ये तर सुमारे १५ कोटी रुपयांचा कांदा विकण्यात आला असून अद्यापही २० ते २५ कोटी रुपयांचा कांदा शिल्लक आहे. तर परकंदीत वाटाण, कांद्यातून दीड ते दोन कोटी रुपये शेतकऱ्यांनी मिळवले आहेत. कारखेलला डाळिंब, कलिंगडातून ३ कोटींवर उत्पन्न मिळाले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाWaterपाणी