शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
3
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
4
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
5
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
6
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
7
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
8
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
9
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
10
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
11
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
13
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
14
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
15
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
16
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
17
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
18
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
19
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
20
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

Satara lok sabha result 2024: साताऱ्यात उदयनराजे भोसले पिछाडीवर, शशिकांत शिंदे १९ हजार मतांनी आघाडीवर

By सचिन काकडे | Updated: June 4, 2024 13:02 IST

Satara lok sabha result 2024: शशिकांत शिंदे यांनी आपली आघाडी कायम ठेवली

सातारा : अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा मतदार संघाचा निकाल फेरीनिहाय समोर येत असून, आतापर्यंत हाती आलेल्या निकालात महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे. नवव्या फेरीअखेर शशिकांत शिंदे यांना २ लाख ६३ हजार ८३४२ तर महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना २ लाख ४४ हजार २७१ मते मिळाली. शशिकांत शिंदे १९ हजार ७१ मतांनी आघाडीवर आहेत.साताऱ्यात कोडोली येथील जिल्हा मार्केट फेडरेशनच्या गोदामात मंगळवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. प्रारंभी पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. यानंतर फेरीनिहाय मतमोजणीस प्रारंभ झाला. पहिल्या फेरीत उदयनराजे भोसले यांनी आघाडी घेतली. मात्र, दुसऱ्या फेरीनंतर शशिकांत शिंदे यांनी आघाडी घेत उदयनराजे यांना पिछाडीवर टाकले. उदयनराजे भोसले यांना पहिल्या फेरीत २७ हजार ५५६ तर शशिकांत शिंदे यांना २७ हजार ५०७ मते मिळाली. दुसऱ्या फेरीत उदयनराजे यांना ५३ हजार ३०४ तर शशिकांत शिंदे यांना ५७ हजार ७४६ मते मिळाली. तिसऱ्या फेरीत उदयनराजे यांना ७४ हजार ३१० तर  शशिकांत शिंदे यांना ८२ हजार ९४६, चौथ्या फेरीत उदयनराजे यांना ९९ हजार २७३ तर शशिकांत शिंदे यांना १ लाख १२ हजार ४७५ मते मिळाली. पाचव्या फेरीअखेर उदयनराजे यांना १ लाख २८ हजार ३७५ तर शशिकांत शिंदे यांना १ लाख ४१ हजार ८२ मते मिळाली. दुसऱ्या फेरीनंतर शशिकांत शिंदे यांनी घेतलेली आघाडी नवव्या फेरीपर्यंत कायम राहिली. नऊ फेऱ्यांचा निकाल हाती आला तेव्हा शशिकांत शिंदे यांनी १९ हजार ७१ मतांनी आघाडी घेतली.

मोठी आघाडी नाही..सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार उभे होते. मात्र प्रमुख लढत ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच होत आहे. प्रमुख दोन उमेदवार वगळता अन्य एकाही उमेदवाराला मतांमध्ये मोठी आघाडी अद्याप घेता आलेली नाही.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsatara-pcसाताराlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेShashikant Shindeशशिकांत शिंदे