शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
4
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
5
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
6
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
7
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
8
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
9
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
11
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
12
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
13
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
14
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
15
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
16
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
17
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
18
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
19
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
20
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण

सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपच्या संयोजकपदी सुनील काटकर 

By नितीन काळेल | Updated: August 30, 2023 17:43 IST

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान 

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघ भाजप संयोजक तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी जिल्हा परिषद शिक्षण समितीचे माजी सभापती सुनील काटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. खासदार उदयनराजे भोसले यांचे सुनील काटकर हे विश्वासू समर्थक म्हणून ओळखले जातात. काटकर यांचे संघटन कौशल्यही उत्कृष्ट आहे. उदयनराजे यांच्या सातारा लोकसभा मतदारसंघातील संघटन कौशल्याची जबाबदारी काटकर यांच्याकडेच असते. संघटन कौशल्य, बेरजेचे राजकारण करण्याची हातोटी आणि जनसंपर्क यामुळे भाजपने त्यांच्यावर सातारा लोकसभा मतदारसंघाची संयोजकपदाची जबाबदारी सोपवली आहे. लोकसभा मतदारसंघाचे संयोजक म्हणून काटकर काम पाहणार आहेत. याशिवाय भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती होताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काटकर यांचे अभिनंदन केले. तर नियुक्तीपत्र प्रदान करताना खासदार उदयनराजे भोसले, भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, सुशांत निंबाळकर, संग्राम बर्गे, काका धुमाळ, पंकज चव्हाण, बाळासाहेब खरात, ॲड. शैलेश संकपाळ, अमोल सणस, ॲड. विनीत पाटील, ॲड. विकास पवार आफी उपस्थित होते. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरlok sabhaलोकसभाBJPभाजपा