शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : कण्हेर धरणातून पाणी सोडण्याने किडगाव-हमजाबाद पूल पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 13:52 IST

कण्हेर धरण जवळपास पूर्ण क्षमतेने भरले असून, पाणीसाठा नियंत्रीत ठेवण्यासाठी धरणातून वेण्णा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. परिणामी किडगाव व हमजाबाद या गावांना जोडणारा वेण्णा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने या पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

ठळक मुद्देकण्हेर धरणातून पाणी सोडण्याने किडगाव-हमजाबाद पूल पाण्यातदोन्ही गावांचा संपर्क तुटला : पावसाची रिपरिप कायमक

किडगाव/सातारा : कण्हेर धरण जवळपास पूर्ण क्षमतेने भरले असून, पाणीसाठा नियंत्रीत ठेवण्यासाठी धरणातूनवेण्णा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

परिणामी किडगाव व हमजाबाद या गावांना जोडणारा वेण्णा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने या पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. दोन्ही गावांचा संपर्क तुटल्याने याचा विद्यार्थी व नोकरदारांना मोठा फटका बसला आहे.सातारा तालुक्यासह कण्हेर धरण क्षेत्रात यंदा समाधानकार पाऊस झाला आहे. तालुक्यातील उरमोडी, कण्हेर ही धरणेही जवळपास पूर्ण क्षमतेने भरली आहेत.

कण्हेर धरणातील पाणीसाठा नियंत्रीत ठेवण्यासाठी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. परिणामी किडगाव व हमजाबाद या गावांना जोडणाऱ्या वेण्णा पुलावरू पाणी वाहू लागले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे.सातारा शहराकडे जाणारा जवळचा मार्ग म्हणून या पुलाकडे पाहिले जाते. त्यामुळे या पुलावरून ये-जा करणाऱ्या नोकरदार व विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे.

वाहतूक बंद असल्याने याचा सर्वांनाच मोठा फटका बसत आहे. पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी असल्यास मुलांना शाळेला सुटी घ्यावी लागत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून किडगाव परिसरात पावसाची संततधार सुरू असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Satara areaसातारा परिसरDamधरण