ठळक मुद्देकेंद्र्रीय जल, विद्युत संशोधन संस्थेच्या पथकाकडून पाहणीकेमिकल कंपाऊंड ट्रिटमेंटद्वारे गळती बंद करण्याबाबत अहवाल सादरकामाच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम

सातारा ,दि.  ०६ :  खडकवासला (पुणे) येथील केंद्रीय जल व विद्युत संशोधन संस्थेच्या तज्ज्ञ संशोधक पथकाने वेण्णा धरणास भेट देऊन गळतीची पाहणी करून अहवाल सादर केलेला आहे. या अहवालामध्ये टोमोग्राफिक स्टडीच्या माध्यमातून गळतीचा मार्ग शोधून केमिकल कंपाऊंड ट्रिटमेंटद्वारे गळती बंद करता येईल, असे नमूद करण्यात आले आहे. या कामाच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात येत असल्याची माहिती सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता विजय घोगरे यांनी दिली आहे.


महाबळेश्वर शहरास १९९२ पासून नगर परिषदेमार्फ त वेण्णा धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. शहरासाठी वेण्णा धरणातून होत असलेला पाणीपुरवठा अपुरा होत असल्याचे निदर्शनास आल्याने १९८५ मध्ये धरणाचा पाणीसाठा वाढविण्याचा निर्णय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने घेतला. त्यानुसार अधीक्षक अभियंता, परिसर अभियांत्रिकी मंडळ, सांगली या पाटबंधारे कार्यालयामार्फ त ५६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा क्षमतेच्या धरणाचे नियोजन करण्यात आले.

या धरणाच्या कामास पाटबंधारे यंत्रणेमार्फ त १९९४ पासून सुरुवात करण्यात आली व जून २००७ मध्ये धरणाचे काम पूर्ण झाले. सध्या धरणामध्ये पूर्ण क्षमतेने म्हणजेच ५६ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा होत आहे. या धरणातील पाणीसाठ्याचा वापर महाबळेश्वर व पाचगणी या दोन शहरांना होत आहे.


दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या धरणाच्या भिंतीला गळती लागल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे. धरणाला धोका निर्माण झाल्याने नुकतीच खडकवासला (पुणे) येथील केंद्रीय जल व विद्युत संशोधन संस्थेच्या तज्ज्ञ संशोधक पथकाने वेण्णा धरणाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच टोमोग्राफिक स्टडीच्या माध्यमातून गळतीचा मार्ग शोधून केमिकल कंपाऊंड ट्रिटमेंटद्वारे गळती बंद करता येईल, असे नमूद करण्यात आले आहे.