शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

सातारा : सेनेच्या जिल्हाप्रमुखपदी जयवंत शेलारांना संधी-पुन्हा खांदेपालट : हर्षद कदम यांची गच्छंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 10:02 PM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत खांदेपालट केली आहे. कºहाड व पाटण तालुक्याची जबाबदारी असणारे हर्षद कदम यांची गच्छंती करण्यात आली असून, त्यांच्या जागी जयवंत शेलार यांची नियुक्ती

सातारा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत खांदेपालट केली आहे. कºहाड व पाटण तालुक्याची जबाबदारी असणारे हर्षद कदम यांची गच्छंती करण्यात आली असून, त्यांच्या जागी जयवंत शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मातोश्रीवरुन नुकतेच आदेश निघाले आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा व सांगली जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांच्या नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. सातारा जिल्ह्यात तीन जिल्हाप्रमुख आहेत. सातारा, वाई व कोरेगाव या तीन विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी राजेंद्र कुंभारदरे यांच्याकडे देण्यात आली आहे. चंद्रकांत जाधव यांच्याकडे फलटण व माण विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे.हर्षद कदम हे पाटण व कºहाड दक्षिण, कºहाड उत्तर मतदारसंघाचे काम पाहत होते. त्यांच्या जागी जयवंत शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपजिल्हाप्रमुख म्हणून सचिन मोहिते (सातारा-जावळी विधानसभा), विठ्ठल गायकवाड (फलटण विधानसभा), सुनील पाटील (कºहाड उत्तर), प्रदीप झणझणे (फलटण). रणजितसिंह कदम (फलटण शहर प्रमुख), अविनाश फडतरे (तालुका संघटक उत्तर कोरेगाव), गणेश उत्तेकर (महाबळेश्वर तालुका), अनिल पवार (खटाव तालुका), सचिन भिसे (क्षेत्र प्रमुख, माण-खटाव) आदींच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, हर्षद कदम यांच्या गच्छंतीबाबत करण्याचे निश्चित कारण काय? याबाबत पत्रकारांनी पक्षाचे संपर्क नेते व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष नितीन बानगुडे-पाटील यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, ‘निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष प्रमुखांनी हे फेरबदल केले आहेत.’आमदारांशी सूत जुळलेच नाहीपाटणचे आमदार शंभूराज देसाई व तत्कालीन जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांच्यात वारंवार खटके उडत होते. देसाई-कदम यांचे सूत जुळले नसल्याने वादाच्या ठिणग्या पडत होत्या. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पाटणमधील तीन गटांत हर्षद कदम यांनी आमदार शंभूराज देसाई यांच्या उमेदवारांना आव्हान दिले होते. कदमांची राजकीय महत्त्वाकांक्षा देसाई गटाला वारंवार आव्हान देत होती. त्यातूनच कदमांची गच्छंती झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारण