शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : करहर, हातगेघर गावांची केंद्रीय आरोग्य पथकाकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 14:09 IST

केंद्र शासनाच्या बाराव्या सीआरएम अंतर्गत आरोग्य सेवेच्या मूल्यांकनासाठी जावळी तालुक्यातील करहर व हातगेघर या गावांना केंद्रीय पथकाने भेट देऊन लाभार्थी व रुग्णांशी संवाद साधत माहिती घेतली.

ठळक मुद्देकरहर, हातगेघर गावांची केंद्रीय आरोग्य पथकाकडून पाहणीविविध तालुक्यांतील गावांना भेटी

पाचगणी : केंद्र शासनाच्या बाराव्या सीआरएम अंतर्गत आरोग्य सेवेच्या मूल्यांकनासाठी जावळी तालुक्यातील करहर व हातगेघर या गावांना केंद्रीय पथकाने भेट देऊन लाभार्थी व रुग्णांशी संवाद साधत माहिती घेतली.महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवा तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत खरंच पोहोचल्या आहेत का? या उद्देशाने केंद्रीय मूल्यांकन कमिटीने आरोग्यसेवेत अग्रेसर असलेल्या सातारा जिल्ह्याची निवड केली आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील गावांना भेटी देण्यात आल्या.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या या आरोग्य सेवांचे मूल्यमापन या केंद्रीय पथकाच्या वतीने करण्यात आले. या पथकाचे प्रमुख डॉ. हिमांशू राय हे असून, यामध्ये डॉ. माथूर, डॉ. शेळके सहभागी झाले होते. तसेच चाळीस अधिकाऱ्यांचाही समावेश होता.करहरमध्ये या पथकाने प्रवेश केल्यानंतर घरोघरी जाऊन लाभार्थी व रुग्णांशी थेट संवाद साधण्यात आला. शासनाच्याच्या वतीने पुरविल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधा प्रत्येक घटकापर्यंत पोहोचतात का? हे पाहण्यासाठी घरोघरी विचारपूस करण्यात आली.तसेच गावचे प्रथम नागरिक म्हणून सरपंचांशीही संवाद साधण्यात आला. एकंदरीत केंद्र शासनाच्या या पथकास उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. हातगेघर येथील उपकेंद्र व आरोग्यवर्धिनी केंद्रासही भेट देण्यात आली. यावेळी डॉ. संतोष गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर, डॉ. बिलोलीकर, डॉ. राजेश गायकवाड आदी उपस्थित होते.हा दौरा यशस्वी करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. आर. मोहिते, डॉ. रासकर, डॉ. अमर शेलार, डॉ. प्रिया गोळे, गट प्रवर्तक परामणे तसेच तालुक्यातील सर्व आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांनी विशेष प्रयत्न केले.

टॅग्स :zpजिल्हा परिषदHealthआरोग्यSatara areaसातारा परिसर