सातारा : नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येतील सूत्रधारांना पकडा, अंनिसची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 14:25 IST2018-08-20T14:23:39+5:302018-08-20T14:25:08+5:30
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुन्याला पकडल्याचे सांगितले जात असले तरी त्यांच्या खुनाच्या कटात जे सूत्रधार आहेत, त्यांना पकडा, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि परिवर्तनवादी समन्वयक समितीच्या वतीने निषेध रॅली काढून करण्यात आली आहे.

सातारा : नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येतील सूत्रधारांना पकडा, अंनिसची मागणी
सातारा : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुन्याला पकडल्याचे सांगितले जात असले तरी त्यांच्या खुनाच्या कटात जे सूत्रधार आहेत, त्यांना पकडा, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि परिवर्तनवादी समन्वयक समितीच्या वतीने निषेध रॅली काढून करण्यात आली आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समिती व परिवर्तनवादी समन्वयक समितीच्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी साताºयात निषेध रॅली काढली. शाहू चौकापासून रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली पोवईनाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आली.
रॅलीमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव प्रशांत पोतदार, डॉ. चित्रा दाभोलकर, प्रसन्न दाभोलकर, वंदना माने, डॉ. दीपक माने, उदय चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते.