शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

सातारा पूर: जिल्ह्याचा पाऊस करणार २००५ ची पुनरावृत्ती !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 12:30 IST

अजून दोन महिने बाकी : आतापर्यंत सरासरी ११०० मिलीमीटर पाऊस  

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने थैमान घातले असून आतापर्यंत वार्षिक सरासरी ओलांडून ११००  मिलीमीटरचा टप्पही पार केला आहे. त्यामुळे पावाळ्याचे अजून पावणे दोन महिने पाहता पावसाची वाटचाल ही २००५ च्या पर्जन्यमानाकडे सुरू असल्याचे दिसत आहे. कारण, त्यावेळी तब्बल २ हजार ८७ मिलीमीटर पाऊस झालेला. 

जिल्ह्यातील पावसाची जून ते सप्टेंबर दरम्यानच्या चार महिन्यातील पावसाची सरासरी  ८३४ मिलीमीटर आहे. त्या तुलनेत दरवर्षी कमी अधिक पाऊस पडत असतो. पण, यंदा या पावसाने वार्षिक सरासरी केव्हाच ओलांडलीय.  ५ ऑगस्टपर्यंत पाऊस ९३६ मिलीमीटर होऊन ११२ टक्के सरासरी राहिलीय. तर ८ ऑगस्टच्या सकाळपर्यंत सरासरी १०९५ मिलीमीटर पाऊस पडलाय. यातील अधिक करुन पाऊस हा गेल्या दहा दिवसांतीलच आहे. 

सध्याचे प्रमाण पाहता पावसाची वाटचाल २००५ या वर्षाकडे सुरू असल्याचे दिसते. कारण, त्यावेळी पावसाळ्यात तब्बल २ हजार ८७ मिलीमीटर पाऊस झालेला. सातारा तालुक्यात १८२१ मिलीमीटर, जावळी २७०२, कोरेगाव १३९५, कºहाड ११८४, पाटण ३२८९, फलटण ४४९, माण ५४२, खटाव ६०५, वाई १५३७, महाबळेश्वरला ८६३९ तर खंडाळा तालुक्यात ७७८ मिलीमीटर पाऊस झालेला. 

२००५ वर्षासारखी आतापर्यंतच्या १४ वर्षात कधीच पर्जन्यवृष्टी झालेली नाही. कारण त्यानंतर २००६ ला जिल्ह्यात सरासरी १९५० मिलीमीटर पावसाची नोंद झालेली. तर २००७ ला १५१०, २००८ मध्ये ११६९, २००९ ला ११३६, २०१० ला १२९७, २०११ मध्ये १२८३, २०१३ ला ११२९, २०१४ मध्ये १२१६, २०१६ साली १२३७, २०१७ मध्ये ११८२ आणि २०१८ साली ११३२ मिलीमीटर पाऊस झाला होता.   २०१५ ला कमी पाऊस...गेल्या १४ वर्षांत फक्त २०१२ आणि १५ सालीच पाऊस कमी झालेला. १२ साली ९३१ तर १५ ला अवघा ७७५ मिलीमीटर पाऊस झालेला. त्यावेळी जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती होती.   

टॅग्स :Satara Floodसातारा पूरWaterपाणी