शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण
2
२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा
3
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनं बाजी पलटली; २८ आमदार असताना भाजपानं ३२ मते कशी मिळवली?
4
IND vs AUS 3rd ODI Live Streaming : टीम इंडियासमोर 'व्हाइट वॉश' टाळण्याचं आव्हान
5
'मोदीज मिशन' पुस्तकातील काही भाग शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा; एकनाथ शिंदेंची मागणी
6
Anil Deshmukh: "पोलिसांचे धाडस कसे झाले?" महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर अनिल देशमुख यांची संतप्त प्रतिक्रिया
7
जम्मू-काश्मीर राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर; नॅशनल कॉन्फरन्स 3, तर भाजपचा 1 जागेवर विजय
8
Women’s World Cup 2025: ज्या पावसाने खाते उघडले, त्याने शेवटी वाटही लावली; पाकची विजयाची पाटी कोरीच!
9
चीनचं धक्कादायक कारस्थान उघड, पँगाँग सरोवराजवळ उभारतोय एअर डिफेन्स कॉम्प्लेक्स
10
मोबाईल चार्जरमध्ये लपवलं १५० ग्रॅम सोनं, तेच ठरलं जीवघेणे; युवकाच्या हत्येचा अखेर उलगडा
11
लालबागमधील हल्लेखोर प्रियकरापाठोपाठ ‘त्या’ मुलीचाही मृत्यू, किरकोळ कारणातून गेले दोन जीव  
12
सोन्या-चांदीचे दर कोसळले! सोनं 2,000, तर चांदी 4,000 रुपये स्वस्त; कारण काय..?
13
Maruti CNG Cars: पेट्रोलच्या वाढत्या किमतींनी हैराण झालात? मारुतीच्या 'या' ५ सीएनजी कार वाचवतील तुमचे पैसे!
14
"कोणत्याही देशाच्या दबावाखाली व्यापार करार करणार नाही", पीयूष गोयल यांचे अमेरिकेला खडेबोल
15
IND vs AUS: कोहलीनं फॉर्म परत मिळवण्यासाठी काय करावं? मोहम्मद कैफचा मोलाचा सल्ला! म्हणाला...
16
दहावी पास झालेल्यांसाठी सरकारी नोकरीची संधी! ३९१ कॉन्स्टेबल जीडी पदांची भरती निघाली
17
‘मोबाईल सर्व्हेलन्स’च्या मुद्द्यावरून बावनकुळेंची सारवासारव, व्हॉट्सअप ग्रुप्सबाबत बोलल्याचा दावा
18
१ लाख व्हॉट्सअप ग्रुप, भाजपाची 'वॉर रूम'; कशी चालते यंत्रणा? बावनकुळेंनी सगळेच सांगितले
19
डॉक्टर अवघड शस्त्रक्रिया करत होते. ती ऑपरेशन टेबलवर सनई वाजवत होती, व्हिडीओ व्हायरल
20
"मला न्याय हवाय, पती-मुलाला लोखंडी रॉडने मारहाण..."; भाजपा महिला नेत्याचा रस्त्यावर ठिय्या

Anil Deshmukh: "पोलिसांचे धाडस कसे झाले?" महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर अनिल देशमुख यांची संतप्त प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 21:13 IST

Satara Phaltan Suicide: महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात काम करत असलेल्या एका महिला डॉक्टराने गुरुवारी (२३ ऑक्टोबर २०२५) रात्रीच्या सुमारास आत्महत्या केली. या घटनेनंतर राजकीय आणि सामाजिक स्तरावर तीव्र पडसाद उमटले आहेत. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना या घटनेवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. महिला डॉक्टरला आत्महत्या करण्यास भाग पाडणे, ही अतिशय दुर्दैवी घटना असून, त्यांनी थेट एका पोलीस अधिकाऱ्याच्या कृत्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

अनिल देशमुख म्हणाले की, "एका पोलीस अधिकाऱ्याला असे कृत्य करण्याचे धाडस कसे होऊ शकते? पोलीस नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आणि लैंगिक अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आहेत. जर पोलिसांचे सदस्य स्वतः अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असतील, तर ते इतरांना न्याय कसा मिळवून देऊ शकतील?", असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

तात्काळ कारवाईची मागणी

"एका पोलीस अधिकाऱ्याच्या कथित लैंगिक अत्याचारामुळे एका महिलेने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले. ही अत्यंत गंभीर बाब आहे. राज्य सरकारने हा मुद्दा खूप गांभीर्याने घेतला पाहिजे. जर पोलीस अधिकाऱ्यांना अशी कृत्ये करण्यास धाडस वाटत असेल, तर ते कायदा आणि सुव्यवस्थेच्या पायालाच धोका निर्माण करू शकतात. म्हणून, राज्य सरकारने कठोर आणि तात्काळ कारवाई केली पाहिजे", अशीही त्यांनी मागणी केली. 

नेमके प्रकरण काय? 

संबंधित महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आपल्या हातावर एक सुसाईड नोट लिहिली. या नोटमध्ये त्यांनी एका पोलीस अधिकाऱ्यासह अन्य एका व्यक्तीच्या नावाचा स्पष्ट उल्लेख केला. एका पोलीस अधिकाऱ्याने आपल्यावर चारवेळा बलात्कार केला. तर, दुसऱ्या व्यक्तीने आपला सातत्याने शारीरिक आणि मानसिक छळ केला. या छळामुळे आणि मानसिक त्रासामुळेच आपण आत्महत्येचे पाऊल उचलत असल्याचे तिने नोटमध्ये नमूद केले. वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Ex-Minister Deshmukh Outraged Over Doctor's Suicide, Blames Police Harassment

Web Summary : Anil Deshmukh alleges a police officer harassed a female doctor, leading to her suicide in Satara. He demands immediate action, citing a suicide note implicating the officer in repeated rape and continuous mental torture, calling it a threat to law and order.
टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्रsatara-acसातारा