सातारा :पाण्याच्या शोधात आलेल्या बिबट्याचा आडात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 11:42 IST2018-11-02T11:40:39+5:302018-11-02T11:42:52+5:30
कऱ्हाड तालुक्यातील बामणवाडी येथे आडात पडून बिबट्याचा बुडून मृत्यू झाल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला.

सातारा :पाण्याच्या शोधात आलेल्या बिबट्याचा आडात बुडून मृत्यू
कऱ्हाड (सातारा) : कऱ्हाड तालुक्यातील बामणवाडी येथे आडात पडून बिबट्याचा बुडून मृत्यू झाल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला.
बामणवाडी येथे वस्तीलगत असलेल्या सुमारे पाच फुट व्यासाच्या आडातील पाण्यावर हा बिबट्या मृतावस्थेत तरंगत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. गावातील अशोक देसाई यांनी या आडावरती घरगुती वापरासाठी पाण्याचा पंप बसविला आहे. ते त्या आडावरती नेहमीप्रमाणे गेले असता, त्यांच्या निदर्शनास ही घटना आली.
ग्रामस्थांच्या मदतीने या घटनेची माहिती त्यांनी तत्काळ वनविभागास दिली . हा बिबट्या पाण्याच्या शोधात तालुक्यातील बामणवाडी वस्तीला लागून असलेल्या शिवारातील अशोक देसाई यांच्या आडाकडे आला असावा.
बिबट्याने या आडातून बाहेर पडण्याची खूप धडपड केल्याचे लक्षात येते. तथापि रात्रीच्या अंधारात तो पडला असावा, त्यामुळे त्याला वाचविता आले नाही, असा उपस्थितांचा सूर होता.