शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

सातारा : दुष्काळी भागात पावसाचा धमाका, जोरदार वृष्टी : ११ तालुक्यांत २३४.७ मिलिमीटरची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 13:27 IST

वरुणराजाने दुष्काळी भागावर वरदहस्त दाखविला आहे. दुष्काळी भागातील प्रमुख गावांमध्ये शुक्रवार, दि. 0८ रोजी सकाळी ७ ते ते शनिवार, दि. ९ सकाळी ७ वाजेपर्यंतच्या कालावधीत जिल्ह्यामध्ये एकूण २३४.७ मिलिमीटर पाऊस झाला. पावसाच्या धमाक्यामुळे दुष्काळी भागातील बंधारे, सीसीटी भरले आहेत.

ठळक मुद्देदुष्काळी भागात पावसाचा धमाका, जोरदार वृष्टी ११ तालुक्यांत २३४.७ मिलिमीटरची नोंद

सातारा : वरुणराजाने दुष्काळी भागावर वरदहस्त दाखविला आहे. दुष्काळी भागातील प्रमुख गावांमध्ये शुक्रवार, दि. 0८ रोजी सकाळी ७ ते ते शनिवार, दि. ९ सकाळी ७ वाजेपर्यंतच्या कालावधीत जिल्ह्यामध्ये एकूण २३४.७ मिलिमीटर पाऊस झाला. पावसाच्या धमाक्यामुळे दुष्काळी भागातील बंधारे, सीसीटी भरले आहेत.खंडाळा तालुक्यात १0५.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बरडमध्ये ७८ मिलीमीटर, तरडगावला ७२ मिलिमीटर, वाठार निंबाळकरला ६४ मिलिमीटर, पुसेगावला ५९.१ मिलिमीटर, मलवडीला ६४ मिलिमीटर, पिंपोडेत ५८ मिलिमीटर तर वाठार स्टेशनला ५३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.ही सर्वच गावे दुष्काळाशी सामना करण्यात वर्षानुवर्षे झगडत आहेत. मात्र नेमकी याच गावांमध्ये पाणी फांउडेशन, वॉटर कप तसेच जलयुक्त शिवार अशा विविध चळवळींच्या माध्यमातून बंधाऱ्यांची कामे, डोंगर उतारांवर सीसीटीमोठ्या प्रमाणावर झाली आहेत.

पावसाने नेमकी याच दुष्काळी भागात वरदहस्त दाखविल्याने या भागातील शेतकरी आनंद साजरा करताना पाहायला मिळत आहेत. पावसाचा जोर वाढल्यास या भागातील दुष्काळ कायमचा हद्दपार होऊ शकतो, असाविश्वास शेतकरी व्यक्त करत आहेत.तालुकानिहाय झालेल्या पावसाची आकडेवारी मिली मीटरमध्ये अशी :सातारा : ११.५, जावली : १५.१, पाटण ६.७, कऱ्हाड : १३.३, कोरेगाव : ३0.६, खटाव : २२.३, माण :२१.६, फलटण : ४३.६, खंडाळा : ४४.३, वाई : १५.९, महाबळेश्वर : ९.७ एकूण : २३४.७

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसmonsoon 2018मान्सून 2018