शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

सातारा जिल्ह्यात ३३६ मिलीमीटर पाऊस, धरणक्षेत्रात जोरदार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 16:23 IST

साताऱ्यांसह जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना धरणात जवळपास तीन टीएमसीने वाढ झाली. सध्या साठा ४६.६२ टीएमसीवर गेला आहे. तर जिल्ह्यात २४ तासांत ३३६ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

ठळक मुद्देसातारा जिल्ह्यात ३३६ मिलीमीटर पाऊस साताऱ्यासह धरणक्षेत्रात जोरदार हजेरी  कोयनेतील साठा तीन टीएमसीने वाढला

सातारा : साताऱ्यांसह जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना धरणात जवळपास तीन टीएमसीने वाढ झाली. सध्या साठा ४६.६२ टीएमसीवर गेला आहे. तर जिल्ह्यात २४ तासांत ३३६ मिलीमीटर पाऊस झाला आहे.गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस कोसळत आहे. या पावसाचा जोर कायम असल्याने ओढे, नाले खळाळू लागले आहेत. तर भात लागणीच्या कामाला वेग आला आहे. सतत पाऊस होत असल्याने पेरणीची कामेही खोळंबली आहेत. त्यातच सोमवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.

मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना धरण परिसरात ९५, नवजा ९६ व महाबळेश्वर येथे ९४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस सरासरी ९५ मिलीमीटर इतका आहे.मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत धोम धरणात २०५३ क्युसेक पाण्याची आवक झाली असून, साठा ४.८२ टीएमसीवर पोहोचला आहे. कण्हेरमध्ये ३.९० टीएमसी साठा आहे. कोयना धरणात २७ हजार ३८३ क्युसेक पाण्याची आवक झाली आहे. बलकवडी, उरमोडी तसेच तारळी धरणातही पाण्याची आवक होत असून, हळूहळू धरणात साठा वाढू लागला आहे.सरासरी १५.८ मिलीमीटर पाऊस...जिल्ह्यात मंगळवारी पहाटे आणि सोमवारी दिवसभरात एकूण ३३६.७ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकूण सरासरी १५.८ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मिलीमीटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे.

सातारा- ५.९ (३०१.३), जावळी - १८.८ (४५६), पाटण - २०.५ (४४१.५), कऱ्हाड- २.५ (२१३.५), कोरेगाव २ (१५६.३), खटाव - १.२ (१८१.६), माण - ०.१ (८८.७), फलटण- १.७ (९३.३), खंडाळा- ९.१ (१५२.६), वाई- ११.७ (२५०.१) आणि महाबळेश्वर-१००.७ (१३६८.७) याप्रमाणे आजपर्यंत एकूण ३७०३.६ तर सरासरी ३३६.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलीमीटरमध्येधोम २२ (३२०)कोयना ९५ (१७७६)बलकवडी ४९ (८२५)कण्हेर ११(२८५)उरमोडी ०७ (३५१)तारळी ३५(५८२)

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Satara areaसातारा परिसर