शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

HSC Exam Result 2025: सातारा जिल्ह्याचा टक्का घसरला, ९२.७६ टक्के निकाल लागला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 15:55 IST

सातारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल दि. ५ रोजी जाहीर झाला. सातारा जिल्ह्याच्या ...

सातारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल दि. ५ रोजी जाहीर झाला. सातारा जिल्ह्याच्या निकालात गेल्यावर्षीच्या तुलनेत काहीशी घट झाली असून यंदा ९२.७६ टक्के निकाल लागला आहे. नेहमीप्रमाणे यंदाही बारावीच्या परिक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. जिल्ह्यात ९६.५६ टक्के मुली उत्तीर्ण झाले असल्याची माहिती जिल्हा शिक्षण विभागाकडून देण्यात आली.उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा दि. ११ फेब्रुवारी त १८ मार्चदरम्यान घेण्यात आली. यामध्ये सातारा जिल्ह्यात ३०३ कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीच्या विद्यार्थ्यांची ५२ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा झाली होती. सातारा जिल्ह्यात नियमित विद्यार्थ्यांमध्ये नोंदणी केलेले ३३ हजार ३४६ विद्यार्थ्यांपैकी ३३ हजार १५२ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३० हजार ७५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर निकाल ९२.७६ टक्के निकाल लागला.पुन:प्रविष्ठ विद्यार्थ्यांमध्ये सातारा जिल्ह्यातून १ हजार ९२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १०८१ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ५३१ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ४९.१२ टक्के निकाल लागला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान शाखेचा टक्का चांगला आहे. विज्ञान शाखेसाठी १८ हजार ३२१ विद्यार्थ्यांची नोंदणी होती. त्यापैकी १८ हजार २८८ विद्यार्थी बसले. त्यामधील १८ हजार ४३ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९८.६६ टक्के निकाल लागला. कला शाखेसाठी ७ हजार ४११ विद्यार्थ्यांची नोंदणी होऊन ७ हजार २९४ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यातील ५ हजार ६२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने ७७.०९ टक्के निकाल लागला. वाणिज्य शाखेतून ६ हजार ३८० विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी ६ हजार ३४९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामध्ये ५ हजार ९८३ विद्यार्थी उत्तीर्ण होवून ९४.२३ टक्के निकाल लागला आहे. व्यावसायिक शाखेसाठी ९१५ विद्यार्थ्यांची नोंदणी होती. त्यापैकी ९०७ विद्यार्थी बसले तर ८४२ विद्यार्थी उत्तीर्ण होवून ९०.८४ टक्के निकाल लागला. आयटीआयसाठी ३९८ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली तर ३१४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २८१ विद्यार्थी उत्तीर्ण होवून ८९.४९ टक्के निकाल लागला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरHSC Exam Resultबारावी निकाल