शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : धरणग्रस्त कोयनेची वीज बंद पाडणार : भारत पाटणकर, कोयनेच्या प्रकल्पग्रस्तांना मोफत विजेसह नोकरीची हमी देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 16:14 IST

संपूर्ण महाराष्ट्राला कोयनेतून वीज पुरविली जाते. मात्र कोयनेच्या प्रकल्पग्रस्तांना शासनाने वाऱ्यावर सोडले आहे. प्रकल्पग्रस्तांना मोफत वीज, नोकरीची हमी आणि पुनर्वसनाच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालय, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालय या तीन ठिकाणी समन्वय साधणारा वेगळा विभाग नेमला गेला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील धरणग्रस्त एकत्र येऊन कोयनेची वीज बंद पाडतील, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिला.

ठळक मुद्देधरणग्रस्त कोयनेची वीज बंद पाडणार : भारत पाटणकरकोयनेच्या प्रकल्पग्रस्तांना मोफत विजेसह नोकरीची हमी देण्याची मागणी

सातारा : संपूर्ण महाराष्ट्राला कोयनेतून वीज पुरविली जाते. मात्र कोयनेच्या प्रकल्पग्रस्तांना शासनाने वाऱ्यावर सोडले आहे. प्रकल्पग्रस्तांना मोफत वीज, नोकरीची हमी आणि पुनर्वसनाच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालय, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालय या तीन ठिकाणी समन्वय साधणारा वेगळा विभाग नेमला गेला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील धरणग्रस्त एकत्र येऊन कोयनेची वीज बंद पाडतील, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिला.येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या दोन दिवसांपासून कोयना प्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. गुरुवारी डॉ. पाटणकर यांनी धरणग्रस्तांना मार्गदर्शन केले. त्यानंतर पुढील वाटचालीविषयी पत्रकारांना माहिती दिली.

डॉ. पाटणकर म्हणाले, स्थानिक जनतेवर वरवंटा फिरवून कोयना धरण उभारले गेले. गेल्या ५८ वर्षांपासून या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविले गेले नाहीत. कोयनेतून संपूर्ण महाराष्ट्राला वीज दिली जाते. सांगली, सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्यांना विजेसह सिंचनासाठी पाणीही दिले जाते. असे असताना धरणग्रस्तांमध्ये बेकारीचे प्रमाण मोठे आहे.

प्रकल्पग्रस्तांना विकतची वीज घ्यावी लागते. या लोकांनी खऱ्या अर्थाने योगदान दिले असताना त्यांना सर्वच हक्कांपासून डावलले गेले आहे. कोयना प्रकल्पग्रस्तांना मोफत वीज द्यावी. सांगली, सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्यांतील उद्योजक या पाण्याचा व विजेचा लाभ घेत आहेत. त्या बदल्यात धरणग्रस्तांना हक्काचे काम त्यांनी का देऊ नये, याची सक्ती शासनाने करावी. या सर्व मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे.मुख्यमंत्र्यांसोबत ३१ जानेवारीला बैठक झाली नाही, अथवा बैठकीत सकारात्मक निर्णय झाला नाही तर सातारा जिल्हाधिकारी कार्यालयापुढे प्रकल्पग्रस्त बसून राहतील, त्याव्यतिरिक्त आणखी १० हजार प्रकल्पग्रस्त त्यांच्या गावाहून साताऱ्यांत दाखल होतील. संपूर्ण महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्तांनाही आमच्या आंदोलनात सामील होण्याची हाक देणार आहे. १ फेब्रुवारी रोजी सर्वजण कोयनेच्या दिशेने चालायला लागतील. कोयनेकडून येणारी वीज बंद केली जाईल, असेही डॉ. पाटणकर यांनी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDamधरण