शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

सातारा : माणगंगेतून शेकडो ट्रकमधून वाळूची लूट, चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 14:01 IST

म्हसवड येथील माणगंगा नदीपात्रात मातीमिश्रीत वाळूचे निष्कासन करण्यासाठी दोन ठिकाणी वाळू उचलण्याचे दोन परवाने दिले आहेत. मात्र ज्या ठिकाणचे परवानगी असताना इतर ठिकाणची सुमारे चाळीस चाळीस फूट खड्डे काढून दिवस रात्र शेकडो ट्रकमधून हजारो ब्रास वाळू उचलून मोठ्या प्रमाणात महसूलच्या नियमांना चुना लावून नियमांचे उल्लंघन करून हजारो ब्रास वाळूची लुट सुरु आहे.

ठळक मुद्दे माणगंगेतून शेकडो ट्रकमधून वाळूची लूटचौकशीची मागणी : २५ वाहनांवर कारवाईचे नाटक

म्हसवड : म्हसवड येथील माणगंगा नदीपात्रात मातीमिश्रीत वाळूचे निष्कासन करण्यासाठी दोन ठिकाणी वाळू उचलण्याचे दोन परवाने दिले आहेत. मात्र ज्या ठिकाणचे परवानगी असताना इतर ठिकाणची सुमारे चाळीस चाळीस फूट खड्डे काढून दिवस रात्र शेकडो ट्रकमधून हजारो ब्रास वाळू उचलून मोठ्या प्रमाणात महसूलच्या नियमांना चुना लावून नियमांचे उल्लंघन करून हजारो ब्रास वाळूची लुट सुरु आहे.त्याबाबत ग्रामस्थांनी अनेक लेखी तक्रारी करून माहितीच्या अधिकारात माहिती मिळण्यासाठी मागणीही केली होती. या अनुषंगाने चार दिवसांपूर्वी महसूल विभागाने सुमारे २५ वाहनांवर कारवाईचे नाटक केले होते. मात्र वाहनातील वाळू पोलीस ठाण्याच्या आवारात खाली करून वाहने सोडून देण्यात आली त्यामुळे यामध्ये सबसे बडा खिलाडी कोण? जिल्ह्यातील व परजिल्ह्यातील ठेकेदाराच्या दबावाने ही कारवाई थांबवली का?, असे प्रश्न जनता विचारत आहे.सध्या माणगंगा नदीपात्रात बनगर यांच्या गट नं. ५७७/१४ मधील ३८ गुंठे क्षेत्रातील १५२४ ब्रास वाळू तर गणपती कलढोणे यांच्या ५७४/२ मधील १३ गुंठ्यातील २३0५ ब्रास मातीमिश्रीत वाळूचे निष्कासन करण्यासाठी दोन ठिकाणी परवाने दिले आहेत.

मात्र याठिकाणी नियमांचे उल्लंघन करून करून मोठ्या प्रमाणात हजारो ब्रास वाळूची लूट होत आहे. यामधील बनगर यांचा परवाना लांबी ३८0 रुंदी ५९ उंची ३.८0 फूट आहे. तर कलढोणे यांचा लांबी २३७ रुंदी १४६ उंची ६.६६ फूट एवढ्या आकाराचा परवाना आहे.

कलढोणे यांच्या ठेक्यात बदल करू संबंधित ठेकेदाराने कलढोणे यांच्या घरात भांडणे लावण्याचे काम केले आहे. या दोन्ही ठिकाणी २५ ते ३0 फूट खोल खड्डे काढून हजारो ब्रास वाळू उपसा केली जात आहे. याबाबत अनेकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्याचे समजते.

ज्या ठिकाणी प्लॉटचे लिलाव करून परवाने दिले आहेत. ते प्लॉट सोडून इतर ठिकाणी उपसा केला जात आहे. परवाने दिलेल्या दोन्ही ठिकाणी १0 वाहनाचा परवाना असताना वाळू ठेकेदार १00 वाहनाच्या सहायाने हजारो ब्रास वाळूचा ऊपसा करत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsandवाळू