शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
6
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
7
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
8
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
9
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
10
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
11
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
12
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
13
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
14
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
15
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
16
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
17
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
18
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
19
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
20
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!

'उदयनराजेंना बिनविरोध अन् माझा पराभव, हे राजकारण न कळण्याइतका मी दुधखुळा नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 09:29 IST

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला.

सातारा: नुकतीच सातारा जिल्हा बँकेची निवडणूक (Satara District Bank Election) पार पडली. या निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे(MLA Shashikant Shinde) यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला. जावळी तालुका सोसायटी मतदारसंघातून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक ज्ञानदेव रांजणे (Dnyandev Ranjane) यांनी शिंदेंचा एक मताने पराभव केला. या पराभवावरुन आमदार शिंदे चांगलेच नाराज असल्याचे पाहायला मिळतंय. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 100 टक्के राजकारण झालं असून राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते माझ्या पराभवाला जबाबदार आहेत, असा खळबळजनक आरोप शिंदे यांनी केला आहे.

हे शिवेंद्रराजेंचे षडयंत्र आहेनिकालानंतर काल(गुरुवार) आमदार शिंदे माध्यमांसमोर आले आणि निकालावर आपली प्रतिक्रिया दिली. 'आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinharaje Bhosle) यांच्यामुळे माझा पराभव झाला, हे त्यांचेच षडयंत्र होते, असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. तसेच, ज्या उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांचा विरोध केला जात होता, मग त्यांना पॅनलमध्ये कसे घेतले, अचानक काय घडलं की महाराष्ट्रातील इतर कोणत्या नेत्याची जादूची कांडी फिरवली गेली आणि उदयनराजेंना बिनविरोध करावं लागलं ? असा सवाही त्यांनी केला.

...इतका दूधखुळा नाहीते पुढे म्हणाले, एका बाजूला तुम्ही सगळे एकत्र येऊन ज्यांच्याशी तुमचे वाद आहेत, त्यांना बिनविरोध करता आणि दुसऱ्या बाजूला पाच वर्ष तुमच्यासोबत चांगलं काम करणाऱ्याचा तुम्ही पराभव करता. हे राजकारण न कळण्याइतका मी दूधखुळा नाही. मात्र, फसवून पाडण्याचा प्रयत्न केला, हे चुकीचंच आहे, असंही ते म्हणाले. 

जयंत पाटील काय म्हणाले ?शशिकांत शिंदेंनी केलेल्या आरोपाबाबत जयंत पाटलांना पत्रकारांनी प्रश्न विचारला, त्यावर पाटील म्हणाले की, शिंदे यांनी माध्यमांसमोर भूमिका मांडली आहे, त्यांची भेट झाल्यानंतर मी त्याबाबत अधिक बोलू शकेल. त्यांचे म्हणने जाणून घेईन, असं मत जयंत पाटील म्हणाले. तसेच, राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आहे, प्रत्येक पक्षाला कुणासोबत आघाडी करायची ते ठरवण्याचा अधिकार आहे, असंही त्यांनी नमूद केलं. 

निवडणूक शिंदेंनी गांभीर्याने घ्यायला हवी होतीसातारा जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला. मात्र, मी अद्याप त्यांच्या पराभवाचं कारण काय असू शकेल याच्या खोलात गेलेलो नाही. पण, त्यांनी ही निवडणूक गांभीर्यानं घ्यायला हवी होती, असं पवार म्हणाले. तसिच, निवडणुकीच्या निकालानंतर साताऱ्यातील कार्यालयावर दगडफेक झाली, ही घटना खूपच दुर्दैवी आहे, असंही पवार म्हणाले.

 

टॅग्स :Shashikant Shindeशशिकांत शिंदेsatara-pcसाताराNCPराष्ट्रवादी काँग्रेसUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसले