शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : दत्ता जाधवसह टोळीवर डब्बल मोक्का, भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 15:23 IST

साखर कारखान्याच्या भंगार मालाचे टेंडर मिळवून देण्यासाठी खंडणीची मागणी करत रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सातारा जिल्हा पोलिसांनी दत्ता जाधवसह टोळीवर आणखी मोक्काअंतर्गत कारवाई केली. टोळीवर हा मोक्काअंतर्गत दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्दे दत्ता जाधवसह टोळीवर डब्बल मोक्काभुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सातारा : साखर कारखान्याच्या भंगार मालाचे टेंडर मिळवून देण्यासाठी खंडणीची मागणी करत रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सातारा जिल्हा पोलिसांनी दत्ता जाधवसह टोळीवर आणखी मोक्काअंतर्गत कारवाई केली. टोळीवर हा मोक्काअंतर्गत दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत माहिती अशी की, प्रतापसिंहनगरमधील कुख्यात गुंड दत्तात्रय रामचंद्र जाधव व टोळीतील सदस्यांविरुध्द सातारा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी व गर्दीत मारामारीचे एकूण अकरा गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर जिल्हा पोलिसांनी यापूर्वी मोक्का लावला होता. काही दिवसांपूर्वी परिवेक्षाधीन पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांच्या पथकाने त्याला प्रतापसिंहनगरमधून अटक केली होती.भुर्ईंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्यात डिसेंबर २०१७ मध्ये भंगार मालाचे टेंडर आॅनलाईन निघाले होते. हे टेंडर मी माझ्या नावावर टाकतो, ते तुम्हाला मिळवून देतो, असे म्हणून दत्ता जाधव याने तक्रारदार व त्याच्या मित्राला दहा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली.

त्यानंतर ते टेंडर मिळाल्यानंतर तक्रारदारांनी भंगार काढण्याचे काम सुरु केले. त्यानंतर पुन्हा दत्ता जाधव व साथीदारांनी चाळीस लाख रुपयांची मागणी केली. तसेच रिव्हॉल्वरचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.दत्ता जाधव व टोळीविरुध्द भुईंजचे पोलीस निरीक्षक बी. आर. भरणे यांनी मोक्काचा प्रस्ताव तयार करून जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाठविला होता. त्या प्रस्तावास त्यांनी मंगळवारी मंजूरी दिली. वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcrimeगुन्हेPoliceपोलिस