शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Satara Crime: डाळिंबाच्या बागेत गांजाची लागवड, एक कोटीचा गांजा जप्त; झटपट श्रीमंतीच्या नादात पडल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 15:51 IST

म्हसवड पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तरीत्या केली कारवाई

सचिन मंगरुळेम्हसवड : ‘माण तालुक्यातील लोणारखडकी येथे शेतातील डाळिंबाच्या बागेत लावलेली एक कोटी पाच लाख रुपये किमतीची सुमारे चारशे तेवीस किलो वजनाची गांजाची झाडे पोलिसांनी जप्त केली. म्हसवड पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तरीत्या आज, मंगळवारी (दि.१४) पहाटे ही कारवाई केली. याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कुंडलिक निवृत्ती खांडेकर (वय ४९) यांच्या शेतात गांजाची लागवड केली आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखा व म्हसवड पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी सोमवारी सायंकाळनंतर घटनास्थळी छापा टाकला. तेव्हा लोणारखडकी येथील कुंडलीक खांडेकर यांच्या शेतातील डाळिंबाच्या बागेत गांजाची सुमारे सात फुटी उंचीपर्यंतची झाडे आढळून आली. या कारवाईत सुमारे एक कोटी पाच लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी कुंडलीत खांडेकर यास ताब्यात घेतले. ही कारवाई रात्री एकपर्यंत सुरू होती. या कारवाईत कुंडलिक खांडेकरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस काॅन्स्टेबल नवनाथ हरिबा शिरकुळे यांच्या फिर्यादीवरून म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलिस अधीक्षक समीर शेख, पोलिस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलिस अधीक्षक नीलेश देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ, पोलिस उपनिरीक्षक विशाल भंडारे, कॉन्स्टेबल साबीर मुल्ला, अभिजित भादुले यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या २७ कर्मचारी तर म्हसवडच्या सहा कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला. सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ तपास करीत आहेत.झटपट श्रीमंत होण्याच्या नादात पडल्या बेड्यालोणारखडकीत कुंडलीक खांडेकर याने चार वर्षांपासून गांजाची थोडी थोडी लागवड केली. या पिकांतून चांगले पैसे मिळतात म्हटल्यावर अपेक्षा आणखी वाढली. यातूनच झटपट मोठे होण्यासाठी गांजाचे मोठ्या प्रमाणावर पीक घेतले, पण खाकीपुढे हा मार्ग अखेरचाच ठरला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस